Conceptual design of proposed multispecialty hospital and medical college esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : शिरपूर होणार पर्यटनासह अत्याधुनिक आरोग्य उपचारांचे केंद्र!

सचिन पाटील.

शिरपूर : शिक्षण, सिंचन आणि रोजगाराच्या क्षेत्रात लक्षवेधी कामगिरी बजावत असतानाच ग्लोबल वॉर्मिंगचे वर्तमान आणि भविष्यातील गंभीर परिणाम लक्षात घेऊन पर्यावरण संवर्धनाचे काम शिरपूर तालुक्यात मोठ्या वेगाने सुरु आहे. त्यासोबतच वैद्यकीय शिक्षण आणि उपचारांसाठी अत्याधुनिक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची उभारणी प्रगतिपथावर आहे. त्यामुळे निसर्ग पर्यटनाचे केंद्र आणि मेडिकल हब असलेला तालुका, अशी शिरपूरची नवी ओळख रूढ होत आहे. (Shirpur will become advanced health treatment with tourism)

माजी शिक्षणमंत्री तथा आमदार अमरीशभाई पटेल आणि माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून पर्यावरण संवर्धन आणि वैद्यकीय सुविधांचा महाप्रकल्प आकारास येत आहे. शिरपूरची आगामी काळातील गरज लक्षात घेऊन या दोन्ही प्रकल्पांचे नियोजन करण्यात आले असून त्याचा मोठा लाभ परिसराला होणार आहे. विशेषत: गुजराथ, मध्यप्रदेशापर्यंत येथील वैद्यकीय सुविधांचा लाभ पोचणार आहे.

करवंदला ड्रीम प्रोजेक्ट

शासन आणि एनजीओ यांच्या समन्वयातून करवंद (ता. शिरपूर) येथे पर्यावरणविषयक महाप्रकल्प साकारला जात आहे. त्या माध्यमातून सुमारे ६२ एकर क्षेत्र हिरवाईने नटणार आहे. पर्यटन स्थळ म्हणून हा भाग विकसित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाने सात वर्षांसाठी श्री विलेपार्ले केळवणी मंडळ, मुंबई या संस्थेसह मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्टला २५ हेक्टर क्षेत्र वनीकरणासाठी सोपवले आहे.

वनीकरणासाठी येणारा संपूर्ण खर्च श्री विलेपार्ले केळवणी मंडळ करणार आहे. लक्ष्यपूर्ती झाल्यानंतर हा भाग महाराष्ट्रातील सर्वाधिक विकसित वनांच्या मालिकेत समाविष्ट होणार असून तेथे पर्यटनविषयक विविध उपक्रम राबवले जाण्याची क्षमता निर्माण होणार आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले असून पटेल बंधू तेथे वैयक्तिक लक्ष देत आहेत. (latest marathi news)

खर्देत मेडिकल हब

कोरोना संक्रमण कालावधीत नागरिकांना उपचारासाठी करावी लागणारी धावपळ, त्यांची काही जणांकडून झालेली लूट लक्षात घेऊन शिरपूरसाठी सुसज्ज आणि अत्याधुनिक उपचार सुविधा असलेले हॉस्पिटल असावे, असा संकल्प पटेल बंधूंनी घेतला. यापूर्वी भूपेशभाई पटेल यांनी अथक प्रयत्न करून पालिकेच्या इंदिरा गांधी इस्पितळाचे अद्ययावतीकरण केले.

मात्र दुर्धर आजार, विकारांवर उपचार आणि शस्त्रक्रियांसाठी त्यांना एका स्वतंत्र युनिटची गरज भासू लागली. त्यामुळे खर्दे बु. (ता. शिरपूर) येथे श्री विलेपार्ले केळवणी मंडळ संस्थेतर्फे तपन मुकेशभाई पटेल मेमोरिअल मल्टीस्पेशालिटी व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे काम सुरु करण्यात आले.

सुमारे ९०० बेडच्या या रुग्णालयाशी वैद्यकीय महाविद्यालयेही जोडली जाणार असून हा संपूर्ण परिसर मेडिकल हब म्हणून विकसित होणार आहे. मेडिकल आणि पॅरामेडिकल कोर्सेसचे अभ्यासक्रम येथे चालवण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रसंगी तोटा सोसूनही काम करण्याची तयारी पटेल बंधूंची आहे.

"पर्यावरण आणि आरोग्य आमच्यासाठी जिव्हाळ्याचे विषय आहेत. आमच्या परीने होईल तितके शुद्ध, प्रदूषणमुक्त आणि निकोप वातावरण देऊ आणि आजारविकारांनी जर्जर झालेल्यांना रोगमुक्त करू असा संकल्प केला आहे. आम्ही गेल्या ४० वर्षापासून सकारात्मक काम करीत आहोत. शिरपूर शहर व तालुक्याची जनता आमच्या पाठीशी नेहमीच उभी राहिली आहे. तिचे ऋण फेडण्याचा हा प्रयत्न आहे."- अमरीशभाई पटेल, आमदार, शिरपूर

"शिरपूर तालुक्याने आमच्यावर भरभरुन प्रेम केले आहे. त्यांच्या प्रेमाचे उतराई होणे शक्य नाही. आमच्या परीने सिंचन, रोजगार व शिक्षण क्षेत्रात कामगिरी बजावली. आता येणाऱ्या पिढ्यांसाठी काम करीत आहोत. त्यांना निसर्गाची साथ आणि सोबत मिळावी म्हणून असली आणि करवंद येथे व्यापक वृक्षारोपण आणि संवर्धन करीत आहोत. महानगरांच्या तोडीस तोड आरोग्य सुविधा असलेले हॉस्पिटल उभारत आहोत. जनतेचा आमच्यावर आणि आमचा जनतेवर नेहमीच विश्वास होता, आहे आणि राहील."- भूपेशभाई पटेल, माजी नगराध्यक्ष, शिरपूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

IND vs BAN: विराट कोहलीने सर्वांसमोर कुलदीप यादवला मैदानात खेचत नेलं, ऋषभ पंतनेही दिली साथ, पाहा Video

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT