Forest Department & Mahavitaran esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : सोळागाव काटवन परिसराला साक्रीच सोयीचे! पिंपळनेर येथील वन, वीज वितरण कंपनीचे कार्यालय गैरसोयीचे

Dhule News : काटवान परिसरातील गावे साक्री विभागाला सोयीची असताना दोन्ही विभाग पिंपळनेरला जोडली गेल्याने वीजग्राहक व वन विभागाशी संबंधित ग्रामस्थांची गैरसोय होत आहे

दगाजी देवरे

म्हसदी : शासनाच्या शासन आपल्या दारी, राजस्व अभियानात प्रशासन गतिमान केले जात आहे. दुसरीकडे लांब अंतरावर शासकीय कार्यालये असल्याने ग्रामस्थांची फरफट अजूनही थांबलेली नाही. साक्री तालुक्यातील सोळागाव काटवन परिसरातील गावे वीज वितरण कंपनी व वन विभागाच्या पिंपळनेर विभागाला जोडली आहेत.

काटवान परिसरातील गावे साक्री विभागाला सोयीची असताना दोन्ही विभाग पिंपळनेरला जोडली गेल्याने वीजग्राहक व वन विभागाशी संबंधित ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. (Dhule Solagaon very convenient for Katwan area news)

सोळागाव काटवान विभागातील म्हसदीसह अन्य गावांना पिंपळनेर सुमारे ५० किलोमीटरवर आहे. दुसरीकडे साक्रीचे अंतर अवघे १८ किलोमीटर आहे. तालुक्याची भौगोलिक रचना पाहता त्याचे चार भाग पडतात. काटवन परिसर पांझरा नदीच्या दक्षिणेकडील भाग, पांझरा व कान या दोन्ही नद्यांच्या काठावरील पांझरा-कान, माळमाथा व पिंपळनेरचा पश्चिमपट्टा असे चार भाग आहेत. चारही भागात भिन्नभिन्नता आढळते. या चार भागांच्या समस्या व विकासाचे प्रश्नही वेगवेगळे आहेत.

साक्री राहील सोयीचे

शासनाने वन विभागवीज वितरण कंपनीच्या संबंधात जे भाग एकमेकांना जोडले आहेत त्याबाबत काटवन भागावर अन्याय झाल्याची भावना तेथील ग्रामस्थांची आहे. काटवन भागातील जनतेला वीज व वन विभागाच्या कोणत्याही समस्यांचे गाऱ्हाणे पिंपळनेरला जाऊन मांडावे लागते. हे दोन्ही भाग साक्रीला जोडले तर सोयीचे होईल.

याविषयी शासनाकडे अनेक वेळा प्रश्नही मांडला आहे. आमदार, खासदारांनी मंत्रालयातही प्रश्न उपस्थित केला आहे. काटवन परिसराला साक्री शहर जवळचे असून, तालुक्याचे ठिकाण आहे. बाजारहाट, बँका, कृषी विभाग, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, शेतकरी सहकारी संघ अगर तहसील कार्यालयाशी नित्याचा संबंध येतो. म्हणून साक्रीला जाऊन सोयीचे असणार आहे. (latest marathi news)

दुप्पट अंतरावरील पिंपळनेर गैरसोयीचेच

म्हसदीसह परिसरात मोठे वनक्षेत्र आहे. वनक्षेत्रालगतच्या गावात वन्यपशूंच्या हल्ल्यात पाळीव प्राणी ठार होतात. अशा वेळी नुकसानग्रस्त पशुपालकास घटनेची माहिती व लेखी पत्र पिंपळनेरला प्रत्यक्ष जाऊन देणे आवश्यक असते. वन विभागासह वीज कंपनीच्या कामासाठी ‘पिंपळनेर’ची वारी ठरलेली असते.

त्यात प्रामुख्याने वीज कंपनीशी वारंवार संबंध येतो. वीज कंपनीच्या भोंगळ कारभाराविषयी ग्राहकांच्या नेहमीच तक्रारी असतात. त्यामुळे स्थानिक ठिकाणी समाधान झाले नाही तर पिंपळनेरला व्यथा मांडली जाते. पिंपळनेरला संबंधित अधिकारी, कर्मचारी भेटतीलच असे नाही.

साक्री, पिंपळनेर व कासारे येथील वीज उपकेंद्रात उपअभियंतापद रिक्त आहे. एकाच उपअभियंत्याकडे अतिरिक्त कार्यभार असल्याने मोठी गैरसोय होत आहे. तीच अवस्था वन विभागाची आहे. कारण वन्यपशूच्या हल्ल्यात पाळीव प्राणी ठार झाला, तर वन विभागाच्या कार्यालयात अर्ज करावा लागतो. भरपाई मिळावी म्हणून कार्यालयीन हेलपाटे मारावे लागतात ते वेगळेच.

भौगोलिकदृष्ट्या तालुका मोठा

साक्री तालुका भौगोलिक व क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यात दुसरा मोठा तालुका आहे. तालुक्यात आजही समस्या ‘जैसे थे’ आहेत. तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये मूलभूत सुविधांचा कायम अभाव असतो. जनताही सोशीकपणे सर्व सहन करते हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

"प्रशासनाने सोळागाव काटवन परिसरातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी वन विभाग व वीज कंपनीची दोन्ही कार्यालये साक्रीशी जोडावीत. ग्रामस्थ, वीजग्राहक व शेतकऱ्यांची गैरसोय दूर होणार आहे. यातून वेळ व आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार नाही."

- गिरीश नेरकर, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ज्योती गायकवाड आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT