Dhule Municipal Corporation esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : आचारसंहितेपूर्वी विकासकामांचा धडाका! मनपा प्रशासकीय स्थायी सभेत 30 कोटींची कामे मंजूर

Latest Dhule News : धुळे महापालिका क्षेत्रातील मोकाट व भटक्या कुत्र्यांचे अँटीरेबीज लसीकरण करण्यासही मंजुरी दिल्याने नागरिकांना तेवढाच दिलासा मिळणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : एकीकडे कर वसुली होत नसल्याने महापालिकेच्या तिजोरीत ठणठणाट असल्याची ओरड होत असतांना दुसरीकडे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी धुळे महापालिका प्रशासकीय स्थायी समिती कामे मंजुरीचा बार उडवत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गुरुवारी (ता. २६) प्रशासकीय स्थायी समितीने तब्बल सुमारे ३० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली.

यापूर्वी सुमारे ५० कोटी रुपयांची कामे मंजूर करून कार्यादेश देण्यात आले आहेत. आचारसंहितेपूर्वी आणखी काही कामे मंजूर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, धुळे महापालिका क्षेत्रातील मोकाट व भटक्या कुत्र्यांचे अँटीरेबीज लसीकरण करण्यासही मंजुरी दिल्याने नागरिकांना तेवढाच दिलासा मिळणार आहे. (30 crore works approved in municipal administrative standing meeting)

धुळे महापालिकेच्या प्रशासकीय स्थायी समितीची सभा दुपारी एकला महापालिका सभागृहात झाली. आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील, नगरसचिव मनोज वाघ, उपायुक्त हेमंत निकम, शोभा बाविस्कर, सहाय्यक आयुक्त प्रांजली मुंडे यांच्यासह विभागप्रमुख, अधिकारी उपस्थित होते.

स्थायी समितीपुढे विविध योजनेंतर्गत कामे मंजुरीचे विषय होते. यात अल्पसंख्याक निधी-२०२३-२४ अंतर्गत प्रभाग १९ व ३ मध्ये एक ते दहा कामे, अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्र विकास योजना-२०२४-२५ अंतर्गत प्रभाग १९,१३,१२ मधील मुख्य रस्ते/चौक/रस्त्यांवर १६ ठिकाणी सोलर हायमास्ट बसविणे, माझी वसुंधरा-२.० अंतर्गत सन २०२३-२४ मनपा हद्दीतील विविध ठिकाणी झाडे लावणे व त्याची एका वर्षाकरिता देखभाल दुरुस्तीचे काम, प्रभाग-१९ मध्ये अल्पसंख्यांकबहुल नागरी क्षेत्रात मूलभूत पायाभूत सुविधांची ४१ कामे.

प्रभाग १९ मध्ये रस्ते कॉंक्रीट करणे, गटार करणे व कंपाउंड वॉल करणे, विशेष रस्ता अनुदान अंतर्गत प्रभाग-१९ मध्ये रस्ते काँक्रीट व गटार, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान (जिल्हास्तर) २०२३-२४ अंतर्गत चाळीसगाव रोडवरील नाल्यास रिटेनिंग वॉल व गेट, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी दलित वस्ती २-२३-२४ अंतर्गत प्रभाग १५ मध्ये रस्ता काँक्रीटीकरण, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना-२०२४-२५ अंतर्गत प्रभाग-४ मध्ये संत रविदास गार्डन येथे अभ्यासिका व व्यायामशाळा बांधणे, माझी वसुंधरा-३.० अंतर्गत धुळे मनपा नवीन प्रशासकीय इमारत येथे २०० केडब्ल्यूपीचे ऑन ग्रीड सोलर सिस्टिम बसविणे,

विकास शुल्क निधी-२०२४-२५ अंतर्गत जयहिंद स्वीमिंग टँकच्या बाजूला फरशी पुलाला लागून रिटेनिंग वॉल बांधणे तसेच संत रोहिदास गार्डनच्या बाजूला ईदगाह मैदान ते छोटा पुलादरम्यान रस्ता काँक्रीटीकरण, प्रभाग-१४ मध्ये रस्ता काँक्रीटीकरण व बंदिस्त पाइप गटार, नगरोत्थान (राज्यस्तर) अंतर्गत स्नेह नगर भागात रस्ता काँक्रीटीकरण व बंदिस्त गटार आदी विविध कामांचा यात समावेश आहे. (latest marathi news)

३० कोटींची कामे

विविध योजनांतर्गत मंजूर कामांमध्ये एकत्रित १०, १६, ४१, १२ कामांसह इतर एकल कामांचा यात समावेश आहे. या सर्व कामांच्या निविदांची एकत्रित रक्कम सुमारे २९ कोटी ७० लाख १३ हजार ५४८ रुपये एवढी आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी मनपा प्रशासनाने कामे मंजुरीचा बार उडविल्याचे दिसते. शासकीय योजनांमधून कामे असली तरी अनेक कामांसाठी मनपालाही निधी द्यावा लागणार आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे मनपाची तिजोरी रिकामी होणार आहे.

दहा हजार कुत्र्यांना लस

मनपा क्षेत्रातील मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर अखेर मनपाला जाग आली. कुत्र्यांचा बंदोबस्त, निर्बीजीकरण होईल तेव्हा होईल. पण, या कुत्र्यांचे अँटीरेबीज लसीकरण करण्याचा निर्णय स्थायीने घेतला. २८ सप्टेंबर या जागतिक रेबिज दिनाचे औचित्य साधून जिल्हा पशुवैद्यकीय पॉलिक्लिनिक यांच्यातर्फे कुत्रे व मांजरी यांचे अँटीरेबीज लसीकरण करण्यात येणार आहे.

याअंतर्गत मनपा क्षेत्रातील अंदाजे दहा हजार मोकाट कुत्र्यांनाही अँटीरेबीज लस देण्यात येईल. प्रतीप्राणी दहा रुपये जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयाकडून आकारणी केली जाईल. या खर्चासह कुत्रे पकडण्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाचा खर्च लागेल. हा विषय मंजूर करण्यात आला.

कामांच्या यादीसह पाहणी करा

महापालिकेच्या माध्यमातून शहरात यापूर्वी सुमारे ५० कोटी रुपये खर्चाची कामे मंजूर केली आहेत. अनेक कामांचे कार्यादेश दिले गेले आहेत. या सर्व कामांची यादी करा तसेच कार्यादेश दिलेली कामे प्रत्यक्षात सुरू झाली की नाही याचीही पाहणी करा, अशा सूचना आयुक्त तथा प्रशासक श्रीमती दगडे-पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT