waiting for rain esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यावर चिंतेचे ढग! साक्री, शिरपूर व शिंदखेड्यात पावसाची प्रतीक्षा कायम

Dhule : नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) वेळेआधी झालेल्या आगमनामुळे धुळे जिल्ह्यात यंदा बहुतेक ठिकाणी ७ जूनलाच ‘मृग’ बरसला.

दगाजी देवरे

Dhule News : नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) वेळेआधी झालेल्या आगमनामुळे धुळे जिल्ह्यात यंदा बहुतेक ठिकाणी ७ जूनलाच ‘मृग’ बरसला. पण, जिल्हाभरात पावसाची हजेरी मात्र असमान असल्याचे चित्र आहे. केवळ धुळे तालुक्यात जोरदार सलामी दिली असली तरी अजूनही साक्री, शिरपूर व शिंदखेडा तालुक्यात बहुतांश भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात पावणेचार लाख हेक्टर क्षेत्रात पेरणीचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला असून, यंदा दोन लाख ३ हजार ४ हेक्टरवर पांढरे सोने (कापूस), तर त्या खालोखाल एक लाख २८ हजार ७१२ हेक्टरवर तृणधान्याच्या पेरणीचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. ()

दुष्काळाने होरपळून निघालेला बळीराजा मात्र पेरणीसह पेरणीपूर्वी आंतरमशागतीच्या कामात व्यस्त आहे. ज्या भागात जोरदार पाऊस झाला अशा ठिकाणी पेरणीच्या कामांनी वेग घेतला आहे. जिल्ह्यात पांढरे सोने अर्थात, कापूस ७५ हजार ०७० हेक्टर (दोन लाख तीन हजार चार हेक्टर अपेक्षित), कडधान्यात उडिद, मुग ३३ हेक्टर (दोन हजार ६०४ हेक्टर अपेक्षित), तृणधान्यात बाजरी, मका, ज्वारी पाच हजार शंभर हेक्टर (एक लाख २८ हजार ७१२ हेक्टर अपेक्षित), गळीत धान्यामध्ये भुईमूग, सोयाबीन दोनशे बत्तीस (२७ हजार ३०९ हेक्टर अपेक्षित) हेक्टरवर आजअखेर पेरणी झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातून दिली.

यंदा चांगला आणि दमदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभाग आणि वेधशाळेने वर्तविला आहे. वर्षभर दुष्काळाने पिचून गेलेला बळीराजा यंदा मात्र हंगाम चांगला येईल या भाबड्या अपेक्षेने पुन्हा काळ्या मातीत नवीन स्वप्नं पाहत सज्ज झाला आहे. लहरी निसर्गाने ज्या ठिकाणी दमदार हजेरी लावली आहे अशा ठिकाणी पेरणीच्या कामांनी वेग घेतला आहे. दुसरीकडे कृषी विभागाकडून बियाणे व खतांचे नियोजन करण्यात आले आहे. यंदा पावसाच्या भरवशावर कापूस लागवडीच्या क्षेत्रात मागील वर्षाच्या तुलनेत काहीअंशी वाढ अपेक्षित आहे. दोन लाख ३ हजार हेक्टरवर कापूस लागवड होण्याची शक्यता आहे.

कापूस, मका क्षेत्र वाढणार

बागायती, जिरायती शेतकऱ्यांचे पैशाचे पीक म्हणून कपाशी खालोखाल भुईमूग, कांदा व मका पिकाकडे पाहिले जाते. यंदा वर्षभर पावसाचे प्रमाण चांगले राहील, या अंदाजाने खरिपात कापूस लागवड क्षेत्रात वाढ दिसणार आहे. दोन लाखापेक्षा अधिक हेक्टरवर कापूस लागवडीचा अंदाज आहे. मागील खरिपात ११९४.२ टक्के क्षेत्रावर कापूस लागवड झाली होती. मात्र, पावसाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळू शकले नाही. (latest marathi news)

नगदी पीक असल्याने कापूस उत्पादनाकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ओढा असतो. त्याशिवाय मका उत्पादनाकडे सध्या शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसून येत आहे. मागील काही वर्षांपासून मका लागवडीखालील क्षेत्रही वाढत आहे. रब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामांत शेतकरी मका उत्पादन घेत आहे. मागील खरीप हंगामात ६० हजार ४३५ हेक्टर क्षेत्रावर अर्थात, १०५.३ टक्के मका पेरणी झाली होती.

यंदा ६७ हजार ७०० हेक्टरवर मका घेतला जाईल, असा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सात हजार हेक्टरने मक्याचे क्षेत्र जिल्ह्यात वाढणार आहे. धुळे तालुक्यात १६ हजार ८००, साक्री २९ हजार ५००, शिंदखेडा दहा हजार ६०० व शिरपूर तालुक्यात दहा हजार ८०० हेक्टरवर मका पेरणीचे नियोजन आहे.

''जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी मृग नक्षत्रात पाऊस झाल्याने खरिप पेरण्यांनी वेग घेतला आहे. शेतकऱ्यांनी जमीनीची ओल पाहून पेरणी करावी. साधारणत: ज्या ठिकाणी ८० मिमी पाऊस व जमिनीत पुरेसा ओलावा झाल्यावरच पेरण्या कराव्यात.''- के. आर. शिरसाठ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धुळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT