AC-Cooler from a new company that has entered the market for sale in Khapar. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Summer Heat : वाढत्या तापमानाने कुलर-एसीला पसंती! यंदा 10 ते 15 टक्क्यांनी किंमतीत वाढ

Summer Heat : उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात झाली असून, फॅन, कूलर, एसी, रेफ्रिजरेटरची मागणी वाढत आहे.

सकाळ वृत्तसेवा

प्रशांत मराठे : सकाळ वृत्तसेवा

खापर : उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात झाली असून, फॅन, कूलर, एसी, रेफ्रिजरेटरची मागणी वाढत आहे. तालुक्यातील व्यावसायिकांनीही विविध कंपन्यांच्या वस्तू उपलब्ध करून दिल्या आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कुलरच्या किंमतीत १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली असून, ग्राहकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. (Dhule Summer Heat Cooler AC preferred with increasing temperature news)

उन्हाळ्याची चाहूल लागताच घराघरात जुने कूलर, पंखे बाहेर काढले जातात. मात्र, दरवर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीला कूलर खरेदीलाही प्राधान्य दिले जाते. व्यापारीवर्ग किंवा सदन कुटुंबाकडून एसीला मागणी असते. बाहेर उन्हाचे चटके बसत असताना घरात किंवा आपल्या दुकान, कार्यालयात कूलर, फॅन, एसीच्या गार हवेत बसणे पसंत करतात. दुपारच्या वेळी दुकानात आलेल्या ग्राहकांना उन्हाची तीव्रता जाणवायला नको, यासाठी अनेक दुकानदार काळजी घेतात. घरात देखील उन्हाचे चटके बसायला नको म्हणून कूलर, फॅन दिवसरात्र सुरू असतात.

ब्रॅण्डेड वस्तूंना मागणी

ज्यांची कूलर घेण्याची देखील आर्थिक क्षमता नाही, असे ग्राहक नवीन फॅन घेणे पसंत करतात. फॅनमध्येही ब्रॅण्डेड व नवख्या कंपन्यांचे फॅन असे दोन प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. ब्रॅण्डेड कंपन्यांचे फॅन १७०० रुपयांपासून उपलब्ध आहेत. चायना, दिल्लीमेड फॅन कुठल्याही वॉरंटीविना ७०० रुपयांपासून उपलब्ध आहेत.  (latest marathi news)

फायबर कूलरकडे कल

कूलर खरेदीला अजून हवा तसा प्रतिसाद मिळत नसला तरी जुने पत्री कुलर आता कमी झाले आहे. फायबर व ब्रॅण्डेड कूलरची क्रेझ निर्माण झाली आहे. आकाराने लहान तसेच घरात कुठेही ठेवता येणे शक्य असल्याने ग्राहक फायबर कूलरच्या खरेदीलाच पसंती देतात, असे विक्रेत्यांनी सांगितले. कूलर साधारणपणे तीन हजारांपासून दहा हजारापर्यंत उपलब्ध आहेत. कूलरच्या किमतीत गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मध्यमवर्गीयांनाही हवाय एसी

एसीच्या किंमतीही आवाक्यात आल्याने आता मध्यमवर्गीयांकडूनही एसीला मागणी येत आहे. शहरात एलजी, सॅमसंग, हायर अशा कंपन्यांचे एसी व फ्रिज वितरक आहेत. साधारण एक टन, दीड टन आणि दोन टन या आकारमानात एसी उपलब्ध आहेत. एसीला वीज जास्त लागते, हा समज आता कमी झाल्याने तसेच नवीन तंत्रज्ञानानुसार वीजबचतीचे अनेक फंडे समजत असल्याने एसी खरेदीला प्राधान्य दिले जाते. एसी साधारणपणे २९ हजारांपासून ३५ हजारापर्यंत उपलब्ध आहेत. एसीसोबतच फ्रिजला देखील डिमांड असून, सिंगल डोअर, डबल डोअर असे फ्रिज १८५ ल‌िटरपासून ८०० लिटरपर्यंत उपलब्ध आहेत.

"कूलरच्या मागणीत फारसा फरक पडलेला नसला तरी अजून उन्हाळ्याची सुरुवात असल्याने एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून मागणी वाढू शकते. कूलरच्या किमती आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात असल्या तरी गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास १० ते १५ टक्क्यांनी त्यात वाढ झाली आहे."- युवराज मराठे, हिमाद्री इलेक्ट्रॉनिक, खापर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT