Summer Heat Waves esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Summer Heat : धुळ्यात पाऱ्याची मजल 44.5 अंशांवर! यंदाच्या उच्चांकी तापमानाची नोंद

Summer Heat : यंदाचा उन्हाळाही धुळे शहर व जिल्हावासीयांना अक्षरशः हैराण करून सोडत आहे. मार्च, एप्रिलनंतर मेमध्येही तापमानाचा पारा चाळिशीवरच आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Summer Heat : यंदाचा उन्हाळाही धुळे शहर व जिल्हावासीयांना अक्षरशः हैराण करून सोडत आहे. मार्च, एप्रिलनंतर मेमध्येही तापमानाचा पारा चाळिशीवरच आहे. गेल्या दोन दिवसांत तापमानाच्या पाऱ्याने थेट ४४.५ अंश सेल्सिअसपर्यंत मजल मारल्याने माणसांसह पशु-पक्ष्यांचे जीव लाहीलाही झाले आहेत. गेल्या दोन दिवसांतील हे तापमान यंदाचे सर्वाधिक तापमान आहे. दिवसभर सूर्याची ही आग सहन केल्यानंतर रात्री थोडा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा असते. ( temperature level in Dhule at 44 degrees in district )

मात्र रात्रीच्या तापमानानेही थेट २८.५ अंश सेल्सिअसपर्यंत मजल मारल्याने रात्रीही जीव कासावीच आहेत. मागील वर्षी पावसाळा जेमतेम झाला. त्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी तीव्र पाणीटंचाईची स्थिती आहे. पाण्यासाठी तहानलेले जीव रानोमाळ भटकत आहेत. त्यात तीव्र उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत.

या वर्षी धुळेकरांना मार्च, एप्रिलमध्ये कडक उन्हाचा सामना करावा लागला. त्यामुळे मे कसा जाईल याची चिंता होती. अपेक्षेनुसार मे हीटचा तडाखा सोसवेना अशी स्थिती आहे. मेच्या सुरवातीपासूनच तापमानाचा पारा चाळिशीपार आहे. त्यामुळे सकाळपासूनच घराबाहेर तीव्र उन्हाचे चटके सहन करावे लागतात. तापमानाचा हा पारा दिवसेंदिवस वाढत आहे.

सर्वाधिक तापमानाची नोंद

गेल्या दोन दिवसांपासून धुळे शहर व जिल्ह्यात प्रचंड ऊन असल्याने अक्षरशः जिवाची लाहीलाही होत आहे. सोमवारी (ता. २०) लोकसभा निवडणुकीसाठी धुळे लोकसभा मतदारसंघात मतदान होते. सोमवारीदेखील ४४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्याची झलक सकाळपासूनच अनुभवायला मिळाली. सकाळी आठपासूनच उन्हाचे चटके बसत होते. अशा कडक उन्हातही मतदानासाठी मतदार बाहेर पडलेले पाहायला मिळाले. (latest marathi news)

उन्हाचे चटके, घामाच्या धारांनी दिवस कसातरी गेल्यानंतर रात्रीही त्याची झळ बसलेली पाहायला मिळाली. रात्रीही तापमान प्रचंड होते. त्यामुळे घरातही गरम वाफा निघत होत्या. तीव्र उन्हाचा हा कहर दुसऱ्या दिवशी अर्थात मंगळवारी (ता. २१) कायम राहिला. मंगळवारीदेखील ४४.५ अंश तापमानाची नोंद झाली. रात्रीचे तापमानही तब्बल २८.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. त्यामुळे रात्रीदेखील काय स्थिती असेल याचा अंदाज येतो. या वर्षी हे सर्वाधिक तापमान नोंदविले गेले.

टाक्या बनल्या हीटर

घरांच्या छतांवर ठेवलेल्या पाण्याच्या टाक्या दिवसभर उन्हातच असतात. त्यामुळे चाळिशीपार तापमानाने या टाक्यांमधील पाणी गरम होते. रात्री उशिरा ते थोडेफार थंड होते. मात्र गेल्या दोन दिवसांत ४४.५ अंश तापमानामुळे टाक्यांमधील पाणी रात्रीही थंड झाले नाही. त्यामुळे प्रत्येक घरात सोलर वॉटर हीटर लावल्यागत स्थिती पाहायला मिळाली.

काळजी घ्या

तापमानाचा पारा ४४.५ अंश सेल्सिअसवर पोचल्याने नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. तीव्र उन्हामुळे उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा, घराबाहेर पडताना टोपी, रुमाल, गॉगल, पाण्याची बॉटल सोबत घ्या. पुरेसे पाणी प्या, उन्हामुळे काही त्रास जाणवल्यास तत्काळ डॉक्टरांकडे जा.

मागील बारा दिवसांतील तापमान कमाल व किमान

१० मे...४१.०/२३.५

११ मे...४१.०/२२.०

१२ मे...४०.०/२३.५

१३ मे...४०.०/२६.०

१४ मे...४०.०/१८.५

१५ मे...४१.०/२४.०

१६ मे...४१.०/२४.०

१७ मे...४२.०/२५.०

१८ मे...४२.५/२६.०

१९ मे...४२.०/२५.५

२० मे...४४.५/२८.५

२१ मे...४४.५/२८.५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT