Dhule News : शहरापासून सात किलोमीटरवर असलेले सुसरी धरण पूर्ण क्षमतेने काठोकाठ भरल्याने सांडव्यातून पाणी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे गोमाई नदीला मोठा पूर आला आहे. नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे. शहादा तालुक्यात सुसरी धरण सर्वांत मोठे आहे. गेल्या दहा दिवसांपासून सातत्याने सातपुडा पर्वतरांगेत जोरदार पाऊस होत आहे. (Susri Dam Overflow Warning to riverside villages)
या पावसामुळे शहादा तालुक्यातील सर्वच लहान-मोठी धरणे तुडुंब भरली आहेत. आधीच वाकी नदीवरील दरा, चिरडे, राणीपूर ही धरणे काठोकाठ भरलेली होती. सुसरी नदीवरील धरण काठोकाठ भरलेले नव्हते.
मात्र गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असल्याने सुसरी धरण काठोकाठ भरले आहे. शंभर टक्के पूर्ण क्षमतेने भरल्याने सांडव्यातून पाणी ओसंडून बाहेर वाहत आहे. (latest marathi news)
सुसरी धरणाचा सांडवा शेजारीच असलेल्या गोमाई नदीपात्रात सोडलेला असल्याने आधीच गोमाई नदीला पूर आलेला आहे. त्यात सुसरी धरणाच्या सांडव्याचे पाणी आल्याने गोमाई नदीला मोठा पूर आला आहे.
पिंगाने, मनरद, लांबोळा, करजई, डामरखेडा, धुरखेडा या गावांतील नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.