Money  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्या!

Dhule News : मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळांतर्गत ओबीसी प्रवर्गातील युवक-युवतींसाठी विविध योजना उपलब्ध असून, त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन संजय तायडे यांनी केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळांतर्गत ओबीसी प्रवर्गातील युवक-युवतींसाठी विविध योजना उपलब्ध असून, त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक संजय तायडे यांनी केले आहे. (Take Advantage of Other Backward Classes Finance Development Corporation Schemes)

थेट कर्ज योजना

या योजनेंतर्गत महाराष्ट्र शासनाने इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी महामंडळामार्फत स्वयंरोजगाराकरिता लघुउद्योग सुरू करण्यासाठी एक लाखाची बिनव्याजी थेट कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेत नियमित परतफेड न करणाऱ्या लाभार्थ्यांना ४ टक्के व्याज आकरण्यात येईल. कर्ज परतफेडीची मुदत चार वर्षे असणार आहे.

२० टक्के बीजभांडवल योजना

या योजनेंतर्गत कमाल मर्यादा पाच लाखांपर्यंतचे प्रकल्पास मंजुरी देण्यात येते. कषी व संलग्न व्यवसाय, वाहतूक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय तसेच पारंपरिक लघु व सेवा उद्योगासाठी कर्ज देण्यात येते. नावीन्यपूर्ण व्यवसायासाठी कर्ज मंजुरीस प्राधान्य देण्यात येते.

मंजूर कर्ज रकमेच्या ५ टक्के लाभार्थी, २० टक्के महामंडळ व ७५ टक्के बँकेचा सहभाग आहे. महामंडळाच्या कर्ज रकमेवर ६ टक्के व्याजदर असून, बँकेच्या कर्ज रकमेवर बँकेचा व्याजदर लागू राहील. कर्जाची परतफेड पाच वर्षांत करावयाची आहे. (latest marathi news)

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना

बँकेने दहा लाखांपर्यंतच्या मर्यादेत कर्ज मंजूर केलेल्या अर्जदाने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यानंतर व्याजाची रक्कम १२ टक्के मर्यादेत्त अर्जदाराच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. ही योजना संपूर्णपणे संगणकीकृत आहे. कर्ज परतफेडीचा कालावधी बँकेच्या निकषानुसार आहे.

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना

ही योजना बँकेमार्फत राबविण्यात येते. इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी बँकेकडून राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी दहा लाख व परदेशी अभ्यासक्रमासाठी २० लाख इतके कर्ज अदा करण्यात येईल. विद्यार्थ्याचे वय १८ ते ३० वर्षे असावे व तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा. अर्जदाराची

कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी भागासाठी आठ लाखांपर्यंत असावी. अर्जदार बारावीत ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा. देशांतर्गत अभ्यासक्रम आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, व्यावसायिक व्यवस्थापन, कृषी, अन्नप्रक्रिया व पशुविज्ञान, कला या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

येथे अर्ज करा

इच्छुक उमेदवारांनी या योजनांच्या माहितीसाठी www.msobcfdc.org या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, टोकर तलाव रोड, नंदुरबार दूरध्वनी (०२५६४-२१००६२) येथे संपर्क साधावा, असेही जिल्हा व्यवस्थापक तायडे यांनी कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT