Shiv Sena party official Uddhav Balasaheb Thackeray giving a statement to Abhinav Goyal on ration grain issue. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : हजारो धुळेकर रेशन धान्यापासून वंचित; जिल्हा पुरवठा विभागावर हलगर्जीपणाचा ठपका

Dhule : जिल्ह्यात रेशन कार्डधारकांसाठी केवायसी अपडेशनचे काम सुरू असून ३० जूनपर्यंत शेवटची मुदत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : जिल्ह्यात रेशन कार्डधारकांसाठी केवायसी अपडेशनचे काम सुरू असून ३० जूनपर्यंत शेवटची मुदत आहे. हजारो नागरिकांचे अद्याप केवायसी अपडेशन झालेले नाही. त्यासाठी प्रयत्नशील नागरिक रेशन दुकानावर गेल्यावर त्या ठिकाणी सर्व्हर डाऊन असणे, रेशनकार्डवरील नावे असलेल्या सदस्यांचे थम्ब न उमटणे, आधारकार्ड अपडेट नसणे आदी बाबींमुळे अनेक धुळेकरांचे केवायसी अपडेशन पूर्ण झालेले नाही. ( Thousands of Dhulekar deprived of ration grains )

यात घोळामुळे हजारो लाभार्थी रेशन धान्यापासून वंचित असल्याची तक्रार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. शिवसेनेने मांडलेली भूमिका अशी : केवायसी अपडेशनसाठी रेशन धान्य दुकान चालक कमी वेळ दुकान उघडे ठेवतो. त्यामुळे नागरिकांना दिवसभर दुकानासमोर ताटकळत उभे राहावे लागते. ही प्रक्रिया पारदर्शकतेने होण्यासाठी शासनाने मुदत वाढवून द्यावी.

असंख्य नागरिकांनी गेल्या अनेक वर्षांपासून आपले रेशन कार्ड नव्याने बनवले, तसेच काही कुटुंब विभक्त झाल्याने त्यांनी आपले कार्ड वेगळे बनवले, काहींनी नव्याने बनवल्याची माहिती समोर आली. यात हजारो रेशनकार्ड ऑनलाइन नोंदी करण्यात जिल्हा पुरवठा विभागाने मोठा घोळ घातला आहे. त्यामुळे शहरातील अंदाजे ५० ते ६० हजार नागरिकांना रेशन धान्यापासून वंचित राहावे लागत आहे.

कामकाजात गैरप्रकार

रेशनकार्ड तयार झाल्यानंतर किंवा रेशनकार्ड मध्ये काही बदल झाल्यावर त्याची ऑनलाइन नोंद करण्यासाठी पुरवठा विभागाने यापूर्वी बाहेरील ई- सेवा संस्थेला काम दिले. त्यात गैरप्रकार झाल्याचा आरोप आहे. आता या ऑनलाइन नोंदी जुन्या मामलेदार कार्यालयात करण्यात येत आहेत. अनेक नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी होत नसल्याच्या तक्रारी केल्यावरही पुरवठा विभागाने दुर्लक्ष केले आहे. (latest marathi news)

गेल्या दहा वर्षांत हजारो गरीब नागरिकांनी आपले रेशन कार्ड बनवले. त्याची संबंधित रेशन दुकानावर नोंद झाली. परंतु, रेशनदुकानांचा धान्यकोटा आधीच्या ग्राहक संख्येनुसार ठरला असल्याने नवीन नोंदी झाल्यावरही रेशन दुकानदारांच्या धान्य कोट्यात कुठल्याही प्रकारची वाढ पुरवठा विभागाकडून झाली नसल्याचे सर्वत्र निदर्शनास आले आहे.

सुसूत्रता आणावी

सध्याच्या रेशन कार्डधारकांची संख्या रेशन दुकानावर नोंद असलेल्या कार्डधारकांची संख्या आणि वितरण होणारे धान्य याचा कुठलाही ताळमेळ पुरवठा विभागाकडून कधी जाहीर केलेला नाही. त्यामुळे नव्याने तयार होणारे, हजारोंच्या संख्येने निर्माण होणारे रेशनकार्डधारक धान्यापासून वंचित राहत आहेत. या प्रकरणी वरिष्ठ स्तरावरून चौकशी व्हावी. ऑनलाइन नोंदीच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणावी. शहर अपर तहसील कार्यालयात धुळे शहर व ग्रामीण

तहसील कार्यालयात धुळे ग्रामीणमधील रेशन कार्डधारकांच्या ऑनलाइन नोंदी व्हाव्यात, असे शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख महेश मिस्त्री, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, किरण जोंधळे, महानगरप्रमुख धीरज पाटील, डॉ. सुशील महाजन, भरत मोरे, ललित माळी, सुनील पाटील, मच्छिंद्र निकम, विनोद जगताप, कैलास मराठे, शिवाजी शिरसाळे, संजय जवराज, भटू गवळी, सुनील चौधरी, कपिल लिंगायत, नितीन जडे आदींनी निवेदनाद्वारे सांगितले.

मागण्यांवर लवकरच तोडगा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जिल्हाधिकारी गोयल यांना मागण्यांचे निवेदन दिले. यानंतर त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांना चर्चेसाठी बोलावून घेतले. शिवसेनेच्या मागण्यांवर लवकर तोडगा काढावा, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. तसेच पुरवठा विभागातर्फे अन्नधान्य वितरण व्यवस्थेत सुसूत्रता आणण्यासाठी सर्व विभागातील कर्मचाऱ्यांची तसेच ई-सेवा चालकांची बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन शेलार यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह शिवसेनेला दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT