Due to the scorching heat of the summer, one can see such silence on the roads esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Summer Heat : वाढत्या पाऱ्याने धुळेकर बेजार! 43 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान; शहरातील रस्ते, बाजारात शुकशुकाट

Dhule News : जे नागरिक कामानिमित्त बाहेर असतात त्यांची पावले थंडपेय घेण्यासाठी वळतात. उसाचा रस, ताक, लस्सी अशा थंडपेयांनाही त्यामुळे मागणी वाढली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Summer Heat : धुळे शहर व जिल्ह्यातील तापमानाचा पारा चाळिशीवर कायम असल्याने, त्यातही हा पारा ४२-४३ पर्यंत पोचत असल्याने जिवाची लाहीलाही होत आहे. या वाढत्या तापमानाने धुळेकर नागरिक अक्षरशः बेजार झाले आहेत. शहरातील नेहमी गजबजलेल्या रस्त्यांवर, मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट पाहावयास मिळतो. जे नागरिक कामानिमित्त बाहेर असतात त्यांची पावले थंडपेय घेण्यासाठी वळतात. उसाचा रस, ताक, लस्सी अशा थंडपेयांनाही त्यामुळे मागणी वाढली आहे. (Dhule tired of rising Temperature up to 43 degrees Celsius)

शहरात सकाळी नऊपासून उन्हाची तीव्रता जाणवायला सुरवात होते. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. वाढत्या उष्म्यापासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिक विविध उपाययोजना करत आहेत. अनेक जण दुपारी दोननंतर सायंकाळपर्यंत घराबाहेर पडणे टाळत असल्याचे पाहायला मिळते. वाढत्या तापमानामुळे ग्रामीण भागातील जनजीवनही विस्कळित झाले आहे.

लग्नसराईचा ताण

तीव्र उन्हाळा सुरू असला तरी लग्नकार्ये मोठ्या प्रमाणावर होताना पाहायला मिळतात. या लग्नकार्यांना जाण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे उन्हाच्या झळा असल्या तरी लग्नकार्याला हजेरी लावण्यासाठी नागरिक बाहेर पडत असल्याचे दिसते. त्यातही सार्वजनिक वाहनांनी प्रवास करणाऱ्या नागरिकांची यात मोठी कसरत पाहायला मिळते. एसटी महामंडळाच्या बसमध्ये प्रचंड गर्दी आहे. त्यामुळे उन्हासह या गर्दीचाही नागरिकांना सामना करावा लागत आहे. (Latest Marathi News)

काळजी घ्या, दुर्लक्ष नको

कडक उन्हामुळे उष्माघातासह इतर आरोग्याचे प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कितीही महत्त्वाची कामे असली तरी उन्हापासून बचाव होईल, आपल्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही. यासाठी नागरिकांनी काळजी घेणे आवश्‍यक आहे. सकाळी दहानंतर, दुपारच्या उन्हात बाहेर पडू नये, डोक्यावर उपरणे, टोपी तसेच गॉगल, सनकोट, स्कार्प वापरून स्वतःची काळजी घ्यावी.

वृद्ध व लहान मुलांनी उन्हात अजिबात चालू नये. सोबत पाण्याची बॉटल ठेवावी. दर अर्ध्या तासाने सावलीत बसून पाणी प्यावे. कडाक्याच्या उन्हात जास्त थंड पाणी लगेच पिऊ नये. शक्यतो सकाळी अकराच्या आत कामे उरकावीत. उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Mahadik : 'या मुन्नाचा भांगसुद्धा कोणी वाकडा करू शकत नाही'; खासदार महाडिकांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार नवाब मलिक आणि सना मलिक यांच्या बाईक रॅलीला सुरूवात

मृणाल दुसानिस झाली बिसनेसवूमन! ठाण्यात 'या' ठिकाणी सुरू केलं नवं हॉटेल; पाहा आतून कसं आहे अभिनेत्रीचं 'बेली लाफ्स'

सावधान! व्हॉट्सॲपवर लग्नाची आमंत्रण पत्रिका येताच क्लिक करू नका, नाहीतर होईल मोठी फसवणूक, वाचा 'या' नव्या स्कॅमबद्दल

जिगर लागतो...! खांद्याला दुखापत, तरीही ऑस्ट्रेलियन खेळाडूने संघासाठी एका हाताने केली फलंदाजी

SCROLL FOR NEXT