Dhule Crime News : कत्तलीच्या इराद्याने रुग्णवाहिकेतून होत असलेली गोवंशाची वाहतूक राखण्यात दोंडाईचा पोलिसांना यश आले आहे. अमानुषपणे तेरा गोवंश जनावरे कोंबून नेली जात असताना वाहन पकडण्यात आले आहे दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पाच लाख रुपये किमतीच्या वाहनासह एक लाख तीस हजार रुपये किमतीचे गोवंश मिळून सहा लाख तीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान वाहनातील तीन गोवंश मृतावस्थेत आढळली. (Dhule Transportation of cattle by ambulance Vehicle seized with 13 animals police action)
दोंडाईचाचे कॉन्स्टेबल निर्मल वंजारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवारी (ता.७) सायंकाळी सात ते आठदरम्यान दोंडाईचा-धुळे रस्त्यावरील अजय पॅलेस हॉटेल समोर रूग्णवाहिकेला (एमपी.०९/बी.ए.०९८१) थांबविण्यात आले. तपासणी केली असता त्यात अत्यंत निर्दयतेने तेरा गोवंश कोंबलेल्या अवस्थेत आढळून आली. यातील तीन गोवंशांचा मृत्यू झाला होता.
चालक विजय पौलाद चौहाण (२४), क्लीनर विक्रम बलराम चौहाण (४०, दोघे. रा.मालवीय, जि. महू, मध्य प्रदेश) यांना ताब्यात घेण्यात आले. अधिक चौकशीत गोवंश विदिशा येथील व्यापारी फुद्दी याच्याकडून मालेगाव येथील व्यापारी बबलू (पूर्ण नाव गाव माहीत नाही) यांच्याकडे कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल झाला आहे..
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलिस अधीक्षक किशोर काळे, शिरपूर उपविभागीय अधिकारी सचिन हिरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे, उपनिरीक्षक चांगदेव हंडाळ, राजन दुसाणे, सुनील महाजन.
निर्मल वंजारी, पुरूषोत्तम पवार, हिरालाल सूर्यवंशी, अनिल धनगर, हर्षद बागूल चालक नरेंद्र शिरसाट केली आहे. उपनिरीक्षक चांगदेव हंडाळ तपास करीत आहे. दरम्यान संशयितांना शिंदखेडा न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.