Tuberculosis  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Tuberculosis News : वर्षभरात दीड हजारावर क्षयरुग्ण; 623 उपचाराअंती बरे

Dhule Tuberculosis : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत गेल्या वर्षभरात दीड हजारावर क्षयरुग्ण आढळून आले.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Tuberculosis News : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत गेल्या वर्षभरात दीड हजारावर क्षयरुग्ण आढळून आले. त्यातील ६२३ रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. दरम्यान, ९१८ क्षयरुग्ण सध्या औषधोपचार घेत आहेत. औषधोपचाराअंती क्षयरुग्ण पूर्णपणे बरा होतो. त्यामुळे रुग्णांनी उपचार घेण्याची गरज आहे. दरम्यान, क्षयरुग्णांसाठी विविध योजाही शासनातर्फे राबविल्या जातात, त्यांचाही रुग्णांना लाभ देण्यात येत आहे. (Dhule Tuberculosis patients on one and a half thousand in year)

२४ मार्च १८८२ ला थोर शास्त्रज्ञ डॉ. रॉबर्ट कॉक् यांनी क्षयरोग जिवाणूंचा शोध लावला. त्यामुळे २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. ‘येस वुई कॅन एन्ड टीबी’ हे यंदाच्या क्षयरोग दिनाचे घोषवाक्य आहे. दरम्यान, राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ दरम्यान धुळे शहरांतर्गत खासगी व शासकीय दवाखान्यातील एकूण १३ हजार ६९३ संशयित क्षयरुग्णांचे थुंकी (बेडका) नमुने तपासण्यात आले.

त्यांपैकी एकूण एक हजार ५४१ क्षयरुग्ण आढळले. त्यातील ६२३ क्षयरुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. ९१८ क्षयरुग्ण सध्या औषधोपचार घेत आहेत. तसेच, डॉट्स प्लस कार्यक्रमांतर्गत १०६९ रुग्णांचे थुंकी नमुने संशयित एमडीआर म्हणून Gene X-pert/ Trunaat Lab धुळे येथे पाठविण्यात आले. त्यातील २७७ रुग्णांपैकी २३ रुग्णांमध्ये डीआर टीबी आढळून आला.

आयआरएल पुणे येथे टीबी रुग्णाचे पुढील चाचणी करण्याकरिता २९३ नमुने पाठविण्यात आले. सद्यःस्थितीत हे टीबी रुग्ण शहर क्षयरोग केंद्रांतर्गत उपचारावर आहेत. यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग, धुळे, इंडियन मेडिकल असोसिएशन, खासगी वैद्यकीय व्यावसायिक, खासगी मेडिकल यांचे सहकार्य लाभले. (latest marathi news)

क्षयरोग कार्यक्रमांतर्गत संशयित क्षयरुग्णांची मोफत तपासणी, मोफत उपचार, कुटुंबातील इतर सदस्यांची तपासणी, निक्षय पोषण योजनेंतर्गत आहारासाठी अनुदान इत्यादी बाबी करण्यात आल्या आहेत, असे शहर क्षयरोग अधिकारी डॉ. जे. सी. पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

क्षयरुग्णांसाठी योजना

प्रत्येक क्षयरुग्णाला उपचार पूर्ण होईपर्यंत प्रतिमहा पाचशे रुपये पोषण आहाराकरिता अनुदान दिले जाते. खासगी डॉक्टरांसाठी क्षयरुग्णांचे निदान करून क्षयरोग केंद्रात रुग्णाची नोंद केल्यास पाचशे रुपये व उपचार पूर्ण झाल्याची नोंद केल्यास पुन्हा पाचशे रुपये देण्यात येतील. धुळे महापालिकेंतर्गत एक हजार १७३ क्षयरुग्णांची नोंद झाली असून, सर्व क्षयरुग्णांना पोषण आहार योजनेंतर्गत दरमहा पाचशे रुपये याप्रमाणे त्यांच्या बँक खात्यात शासकीय अनुदान जमा करण्यात आले आहे.

तसेच धुळे शहरातील ५७ खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनादेखील त्यांनी क्षयरुग्ण निदान करून त्यांची शासनाकडे नोंद केल्याने पाचशे रुपये प्रतिक्षयरुग्ण शासकीय अनुदान त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे. प्रधानमंत्री टीबीमुक्त अभियानांतर्गत धुळे शहरातील १२६ निक्षय मित्र यांनी योगदान दिले असून.

एक हजार ७३९ पोषण आहार किट (Food Basket) क्षयरुग्णांना वाटप करण्यात आले आहेत. तसेच यापुढेही शहरातील दानशूर व्यक्ती, उद्योगसमूह, बँक व विविध संस्था इत्यादी सदरील उपक्रमात सहभाग नोंदवावा व क्षयरुग्णांना मोफत पोषण आहार उपलब्ध करण्याबाबत आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT