Dhule News : वंचितांसह मागास समाजाला शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी पीएम सूरज हे पोर्टल नव्याने सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले.
केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या आधिपत्याखालील राष्ट्रीय महामंडळामार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे देशातील एक लाख लाभार्थ्यांना सवलतीचे कर्जवाटप तसेच पीएम सूरज पोर्टलचे उद्घाटन झाले. (Dhule Union Minister of State Dr. Karad statement PM Suraj Portal for development of backward society including disadvantaged)
यानिमित्त येथील राजर्षी शाहू महाराज नाट्यमंदिरात बुधवारी (ता. १३) झालेल्या कार्यक्रमात डॉ. कराड बोलत होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे, खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता,
महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील, जळगावचे समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी महापौर प्रदीप कर्पे, चंद्रकांत सोनार आदी उपस्थित होते.
सर्व घटकांचा विकास
मंत्री डॉ. कराड म्हणाले, की प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दहा वर्षांत समाजातील सर्व घटकांचा विकास केला आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून वंचित आणि उपेक्षित गटातील लाभार्थ्यांसाठी विविध योजना राबविल्या आहेत. त्यांच्या या कामामुळे देशामध्ये आमूलाग्र असा बदल झाला असून, नागरिकांना आत्मनिर्भर आणि स्वयंपूर्ण होण्यासाठी मदत झाली आहे.
कर्जाची उपलब्धता
पीएम सूरज पोर्टलच्या माध्यमातून गरीब, वंचितांनी अर्ज सादर केल्यावर त्यांना कर्ज मंजूर होईल. केंद्र सरकारने प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या माध्यमातून दहा हजारांपासून ते ५० हजारांपर्यंत कर्ज प्रकरणे मंजूर केली आहे. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री जनधन योजनेच्या माध्यमातून ५४ कोटी नागरिकांचे खाते काढण्यात आले आहे. (latest marathi news)
सुशिक्षित तरुणांना उद्योग-व्यवसायासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून ५० हजारांपासून ते दहा लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेच्या माध्यमातून दोन लाख रुपयांचा गरिबांचा विमा काढण्यात आला आहे. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून पाच लाखांपर्यंत विविध आजारांवर मोफत उपचार मिळणार आहेत, असे मंत्री डॉ. कराड म्हणाले.
लाभार्थ्यांना लाभवाटप
मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळांतर्गत राधिका उदीकर यांना एक लाख ९८ हजार, विजय पाटील यांना ६० हजार, नंदू गवळी यांना दोन लाख रुपयांच्या प्रातिनिधिक स्वरूपात धनादेशाचे वाटप करण्यात आले. तसेच पठाण युनिसखान शरीफखान, वैभव सोना.
अनिल मनोहर भगवान यांना प्रातिनिधिक स्वरूपात आयुष्यमान भारत कार्डचे वितरण करण्यात आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन विकास साधलेल्या काही लाभार्थ्यांशी ऑनलाइन संवाद साधला. वाहिद अली यांनी सूत्रसंचालन केले. मनपा आयुक्त अमिता दगडे यांनी आभार मानले..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.