धुळे : आचारसंहिताभंगाच्या प्राप्त तक्रारीसंदर्भात जाहीर प्रकटनाच्या माध्यमातून भाजपचा प्रचार करीत असल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध झाल्याने जिल्हाधिकारी तथा नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे सहाय्यक निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी धुळे शहर अपर तहसील कार्यालयाचे महसूल सहाय्यक नीलेश नेमाणे यांना मंगळवारी (ता. १७) सेवेतून निलंबित केले. तसेच त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्याचा आदेश दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक संघटक भूषण पाटील यांनी जिल्हाधिकारी शर्मा यांच्याकडे महसूल सहाय्यक नीलेश नेमाणे यांनी आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार दाखल केली. त्याबाबत आचारसंहिता कक्षप्रमुख तथा अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण यांनी चौकशी केली आणि वस्तुनिष्ठ अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. (Dhule Update Suspended as Revenue Assistant Dhule News)
नेमाणे सरकारी कर्मचारी आहेत. सध्या नाशिक विभाग पदवीधर निवडणूक सुरू असताना आणि याअनुषंगाने आचारसंहिता लागू असतानाही नेमाणे यांनी विविध माध्यमातून भारतीय जनता पक्षाचा प्रचार करणारे जाहीर प्रकटन केले आणि आचारसंहितेचा भंग केला, अशी तक्रार झाली.
भाजपचे संबंधित पुढारी, पक्षाचे चिन्ह आणि सरकारी कर्मचाऱ्याने आचारसंहितेचे पालन करणे अपेक्षित असूनही त्याचे छायाचित्र जाहीर प्रकटनात दिसून आले. ते सरकारी कर्मचारी असूनही त्यांनी आचारसंहितेचा भंग केला. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे व सेवेतून बडतर्फ करण्याची शिफारस चौकशी अहवालाद्वारे करण्यात आली.
याद्वारे सरकारी कर्मचारी नेमाणे यांनी तरतुदीसह आचारसंहितेचा भंग केल्याचे दिसून आल्याने त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. निलंबन कालावधीत नेमाणे यांना शिंदखेडा तहसील कार्यालय हे मुख्यालय म्हणून दिले असून, त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.