Vehicles and office of Bharat Agro Company vandalized in industrial estate. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : मध्य भारत ॲग्रो कंपनीत तोडफोड; हल्लेखोरांवर कठोर कारवाईची गरज

सकाळ वृत्तसेवा

चिमठाणे : नरडाणा (ता. शिंदखेडा) एमआयडीसीत अस्तित्वात येणाऱ्या मध्य भारत अॅग्रो प्रोडक्ट कंपनीच्या कार्यालयावर ३० ते ४० जणांच्या जमावाने हल्ला चढविला. त्यात वाहने आणि कार्यालयाच्या तोडफोडीतून समाजकंटकांनी ८० ते ९० लाखांचे नुकसान केले. विविध राजकीय पक्ष नरडाणा औद्योगिक वसाहतीच्या विकासात खीळ घालण्यात अग्रेसर दिसतात. राजकीय व्यासपीठावरून नरडाणा एमआयडीसीच्या विकासाचे गोडवे गायचे आणि पडद्याआडून वेगळी कृती करायची, असे गंभीर चित्र आता समाजासमोर येऊ लागले आहे. (vandalism at Madhya Bharat Agro Company )

जिल्ह्यासह शिंदखेडा तालुक्याला आर्थिक ऊर्जा देणाऱ्या नरडाणा औद्योगिक वसाहतीत उद्योग येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, ते सुरू होण्याआधीच विविध राजकीय पक्षांकडून कुठल्या ना कुठल्या कारणाने उद्योजकांना मदत करण्याऐवजी त्यांना अडचणीत आणण्याचे उद्योग चालतात, अशी गंभीर चर्चा आता लपून राहिलेली नाही. विविध पक्षीय नेते, कार्यकर्त्यांचे हित साध्य करण्यासाठी उद्योग सुरू होतात का, असा प्रश्‍नही चर्चेत आहे.

४० जणांकडून हल्ला

औद्योगिक वसाहतीतील वाघाडी (ता. शिंदखेडा) येथे सकाळी अकराच्या सुमारास मध्य भारत अॅग्रो प्रोडक्ट लिमिटेड कंपनीच्या अर्थात खतनिर्मितीच्या प्रकल्पस्थळी ३० ते ४० लोकांनी हल्ला चढविला. काही वाहने व कंपनीच्या तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या कार्यालयाची तोडफोड केली. नरडाणा औद्योगिक वसाहतीत नरडाणा, बाभळे, वाघाडीचा समावेश होतो. त्यात मध्य भारत अॅग्रो प्रोडक्ट लिमिटेड कंपनीचे सुमारे दीडशे एकर क्षेत्रात खतनिर्मिती प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. (latest maratahi news)

त्रास देण्याचे प्रकार

नरडाणा औद्योगिक वसाहतीत उद्योजक येतात व प्रकल्प उभारतात. ते बांधकाम सुरू करतात. परंतु, त्यांना काही राजकीय पक्ष, असंतुष्ट लोकांकडून त्रास देण्यात येत असल्याचा वारंवार आरोप होतो. भारत अॅग्रो कंपनीद्वारे दोन हजार हातांना रोजगार मिळणार आहे. या प्रकल्पाचे इंदूर येथील सीसीपीएल व पुणे येथील एलएलपी प्रायव्हेट कंपनीना बांधकाम देण्यात आले आहे. परंतु ४० लोकांनी कंपनीच्या साइटवर अनधिकृतपणे प्रवेश करीत जेसीबी, डंपर, कंपनीच्या अस्थायी कार्यालयात विविध साहित्यासह लॅपटॉप, कॉम्प्युटर, एसीची तोडफोड केली. बांधकाम साहित्य पुरविण्याच्या वादातून ही तोडफोड झाल्याची चर्चा आहे.

''खासगी वाहनाने हल्लेखोर गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास हत्यारांसह कंपनीत घुसले. त्यांनी साहित्यासह वाहनांची तोडफोड केली. तसेच एक ते दीड लाखाची रोख रक्कम नेली. कंपनीच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना मारहाण केली.''- अंकुर स्वर्णकार, प्रोजेक्ट मॅनेजर, भारत अॅग्रो प्रोडक्ट लिमिटेड कंपनी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Editorial Article : अग्रलेख - विकृतीला पायबंद

Sakal Editorial Article : भाष्य - अमेरिकी निर्बंधांचे 'औषध'

Sakal Editorial Article : हौस ऑफ बांबू - 'पुरुषोत्तम' साठीचा झाला नव्हं..!

सकारात्मक विचारसरणीचे फायदे

‘आहारही काटेकोर हवा’

SCROLL FOR NEXT