Traveling by boat risking life and work of an incomplete bridge. esakal
उत्तर महाराष्ट्र

SAKAL Exclusive : नर्मदा नदीकाठावरील गावे पायाभूत सुविधांपासून वंचित

SAKAL Exclusive : नर्मदा नदीकाठावरील अनेक आदिवासी गावे व पाड्यांपर्यंत जायला आजही योग्य रस्ता, वीजपुरवठा व अन्य पायाभूत सुविधा नाहीत.

एल. बी. चौधरी

SAKAL Exclusive : नर्मदा नदीकाठावरील अनेक आदिवासी गावे व पाड्यांपर्यंत जायला आजही योग्य रस्ता, वीजपुरवठा व अन्य पायाभूत सुविधा नाहीत. काही गाव-पाड्यांना जोडण्यासाठी नर्मदेच्या उपनदीवर पूल मंजूर असून, बांधकामही सुरू आहे. मात्र बांधकाम एवढ्या संथगतीने सुरू आहे, की सुमारे १५ वर्षे होऊनही पूर्ण झाले नाही. (Dhule Villages on banks of Narmada river are deprived of infrastructure)

परिणामी नदीकाठावरील ग्रामस्थांना मोठे हाल भोगावे लागतात व जीव धोक्यात घालून नावेतून प्रवास करावा लागतो. नर्मदा नदीकाठावरील गावांना दळणवळणासह किमान सुविधा मिळाव्यात, अशी मागणी धडगाव (जि. नंदुरबार) येथील नर्मदा बचाव आंदोलनाचे कार्यकर्ते चेतन साळवे यांनी केली आहे.

सध्या समृद्धी महामार्ग, मेट्रो व हजारो किलोमीटर रस्त्यांचे जाळे विणले व एक विकसित भारत निर्माण केल्याची जाहिरात दिवसातून शेकडो वेळा विविध माध्यमांतून दाखविली जात आहे. निवडणुकीपर्यंत जाहिरातींचा मारा सुरूच राहील. नर्मदा नदीकाठी किंवा सातपुड्यात राहणारे याच विकसित भारताचे नागरिक आहेत मग या गावांना जोडणारा बारमाही चांगला रस्ता का नाही?

सावऱ्या दिगर हे गाव सरदार सरोवरामुळे बेट झाले आहे. गावाला रस्ता व पूल बनवून दिला तर दळणवळणाचा प्रश्न सुटेल, असे २००५ मध्ये भिंगारे समितीने सांगितले. रस्ता व पूल मंजूर झाला; परंतु २०२४ उजाडले तरी पुलाचे बांधकाम अपूर्ण आहे. सध्या नदीत पाणी असल्याने नावेतून (पिलर्स) प्रवास होतो. पण १५ दिवसांनंतर तेथील पाण्याची पातळी खाली जाईल आणि चिखल व दलदलीतून वाट काढावी लागेल. (latest marathi news)

सावऱ्या दिगरच्या पुलासाठी पुन्हा नवीन निधी मंजूर झाला; परंतु पुलाचे काम पूर्णत्वास कधी येईल? सध्या कुणाला किती जागा मिळतील, कुणाला खासदारकी मिळेल यावर चर्चा सुरू आहेत; परंतु सातपुड्यातील, स्थलांतर, कुपोषण, धडगावला पोचण्यासाठी तळोदा ते धडगाव रस्त्याची दुरवस्था लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना दिसत नसेल का? खेतिया फाटा ते दरा रस्त्याचे काम गेल्या एक वर्षापासून सुरू आहे.

ते कधी पूर्ण होईल काहीच सांगता येत नाही. चारचाकी वाहन सोडाच, मोटारसायकलनेदेखील प्रवास करणे शक्य नाही अशी स्थिती आहे. उन्हाळा सुरू झाला असून, धडगावला चार ते पाच दिवसांनी पाणी मिळते. हर घर जल योजनेचे काय? दुर्गम भागात तर याहून बिकट परिस्थिती आहे. धड रस्ते नाहीत, नर्मदा नदीकाठच्या गावांमध्ये अजून वीज पोचली नाही. कधी दूर होईल हा अंधार? शासनाला लवकर जाग येवो, अशी अपेक्षा श्री. साळवे यांनी व्यक्त केली आहे.

हा अभिमान की लाज?

सावऱ्या दिगरला एका गर्भवतीला प्रसूतीसाठी दवाखान्यात घेऊन जात असताना नावेच्या अभावाने ती नदीकिनारीच बाळंतीण होऊन मुलगी झाली म्हणून तिचे नाव नंदिनी ठेवले. याचा अभिमान बाळगायचा की लाज, असा प्रश्न पडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT