A herd of monkeys quenching their thirst on water drawn from a cowherd in a forest area. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Water Crisis : पाण्याचा टिपूस नसल्याने वानरे व्याकूळ! पाणवठे तयार करण्याचा वनविभागाला विसर ?

Dhule News : उन्हाळ्यात वन्यजीवांच्या पिण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी पाणवठा तयार करण्याचा विसर वनविभागाला पडल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.

दगाजी देवरे

म्हसदी : वनक्षेत्रात कुठेही पाण्याचा टिपूस नसल्याने वन्यप्राणी ' व्याकूळ' झाले आहेत. राहूड - काळगाव (ता.साक्री) येथील कुरमाळ वनक्षेत्रात वानरांच्या कळपाने गुराखी जवळील पाण्याचे ढबडे हिसकावत पाण्याची तृष्णा भागविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. गुराख्याने प्रसंगावधान राखत राहूड शिवारातील शेवडीतील पाणी काढून मुक्या प्राण्यांची तहान भागविली. यामुळे उन्हाळ्यात वन्यजीवांच्या पिण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी पाणवठा तयार करण्याचा विसर वनविभागाला पडल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. (Dhule Water Crisis Monkeys worried because no water supply )

पाण्याच्या कमतरतेमुळे जंगलातील वन्यजीवांचे वास्तव्य धोक्यात आले आहे. मंगळवारी (ता.२३) काळगाव येथील गुराखी काशिनाथ लाला अहिरे कुरमाळ वनक्षेत्रात आपली गुरे चरायला घेऊन गेले होते. वनक्षेत्रात कुठेही पाण्याचा टिपूस नसल्याने श्री. अहिरे यांच्या गळ्यात पाण्याचे ढबडे पाहून माकडांचा कळप पाण्यासाठी त्यांच्या जवळ पिण्याचे डबडे हिसकावत पाण्याची तृष्णा भागविण्याचा केविलवाणा प्रयत्नही केला. त्यानंतर श्री. अहिरे यांनी राहूड वनक्षेत्रातील शेवडीतून पाणी काढून माकडांची तहान भागविण्याचा प्रयत्नही केला.  (latest marathi news)

वनविभागास पाणवठ्याचा विसर?

जंगलात वानरांना खाण्यासाठी काही मिळत नसल्याने त्यांनी गावाकडे आपला मोर्चा वळविला आहे. वनक्षेत्रात पाण्याचा टिपूस नसल्याने वन्यप्राणी सैरभैर झाली असूनही वनविभागाला याचे फारसे गांभीर्य नसल्याचे चित्र आहे. वन्यजीवांचे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी हाल होवू नये म्हणून वनविभागाकडून कृत्रिम पाणवठे तयार केले जात असतात. अशी व्यवस्था या परिसरात करण्याची मागणी देखील नागरिक करत आहे. मात्र याबाबत वन

"यंदा अत्यल्प पावसामुळे वनक्षेत्रात कुठेही पाण्याचा थेंब नाही. पाण्याअभावी वन्यप्राण्यांचा जीवही जाऊ शकतो. पावसाळा सुरू व्हायला अजून दीड महिन्यापेक्षा अधिक काळ जाणार आहे. तो पर्यंत पाण्याची निकड लक्षात घेऊन वनविभागाने तत्काळ उपाययोजना करावी."

- विजय भामरे, काळगाव.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: “आचारसंहिता संपल्याबरोबर डिसेंबरचे पैसे बहिणीच्या खात्यात जमा होतील”; CM शिंदेंची घोषणा

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Champions Trophy 2025: झुकेगा नहीं साला... म्हणत होते, पण BCCI समोर पाकिस्तानची शरणागती, भारताचे सामने 'या' देशात

Raj Thackeray: मुल्ला मौलवी उद्धव ठाकरेंसाठी फतवे काढताहेत, राज ठाकरेंचा आरोप! पुतण्याच्या बालेकिल्ल्यात काढला फतवा

Aditya Thackeray: सत्तेत आल्यास पहिला निर्णय शेतक-यांच्या कर्जमाफीचा! आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT