Dhule News : आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचे किमान एक हजार उमेदवार उभे करून सर्व पक्षांसह सरकारची गळचेपी करण्याचा निर्णय धुळे जिल्हा सकल मराठा समाजाने बैठकीत घेतला. मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानुसार शिंदखेडा, धुळे, दोंडाईचा, सटाणा तालुके तसेच धुळे शहर, मालेगाव शहर, मालेगाव ग्रामीण आदी ठिकाणी गावागावांत जाऊन बैठका घेऊन जास्तीत जास्त मराठा उमेदवार उभे करण्याचा संकल्प व निर्धार बैठकीत करण्यात आला. (Dhule We will strangle government by fielding thousand candidates marathi news)
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. त्याची किंमत सत्ताधारी पक्षाला चुकवावी लागेल. सत्ताधारी पक्षाने केंद्र सरकारची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता, आरक्षणाची मर्यादा न वाढविता मराठा समाजाला भूलथापा देऊन भविष्यात न टिकणारे आरक्षण मराठा समाजाच्या पारड्यात पाडले आहे. मात्र, त्याचीही अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे मराठा समाज पेटून उठला आहे.
या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा मराठा समाजाची मराठा सेवा संघाच्या कार्यालयात बैठक झाली. धुळे जिल्हा सकल मराठा समाजाचे सुधाकर बेंद्रे, भानुदास बगदे, विनोद जगताप, राजेंद्र काळे, निंबा मराठे, भोला वाघ, हरिश्चंद्र लोंढे, लक्ष्मण ढोबळे, अशोक पाटील, संदीप पाटोळे, मनोज ढवळे, दीपक रौंदळ, दीपकुमार साळवे, सुरेश पवार, किशोर वाघ, दिनेश काळे, भय्या शिंदे, गोविंद वाघ, नरेंद्र हेमाडे, प्रभाकर वाघ, बाळासाहेब जाधव, सुरेश पवार, विनायक भोसले यांच्यासह इतर मान्यवर, समाजबांधव उपस्थित होते. (latest marathi news)
सरकारने वेळ मारली
मराठा समाज बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेळोवेळी मराठा समाजाची दिशाभूल केली. मराठा समाजाने सग्यासोयऱ्यांबाबत योग्य निर्णय घेण्यास सांगितले. त्याबाबत निर्णय घेतलेला नाही. यावरून सरकारचा नाकर्तेपणा दिसून येतो. तसेच आजपर्यंत सरकार फक्त वेळ मारून नेण्याचे काम करत असल्याचे सिद्ध होते.त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल, मोठी किंमत मोजावी लागेल, अशा भावना मराठा समाजबांधवांनी व्यक्त केल्या.
मराठा समाजाच्या या निर्णयाला दलित, आदिवासी व मुस्लिम समाजानेही पाठिंबा दर्शविला असून, लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर उमेदवारी दाखल करणार असल्याचे धुळे जिल्हा सकल मराठा समाजाने म्हटले आहे. मराठा समाजाचे जास्तीत जास्त उमेदवार उभे करणे, मार्गदर्शन करणे, त्यादृष्टीने व्यूहरचना करणे, जनजागृती करणे या अनुषंगाने बैठकीत चर्चा झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.