Dhule Lok Sabha Election  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Lok Sabha Election : मोदी- गांधी यांच्यापैकी कुणाची जादू चालणार?

निखिल सूर्यवंशी - सकाळ वृत्तसेवा

Dhule Lok Sabha Election : शेतीविकास, कांद्याची निर्यात, प्रकल्पातून शहरासाठी पाणी पळविणे, सिंचन, जीवनावश्‍यक वस्तूंसाठी जीएसटी, औद्योगिक विकास आणि बेरोजगारी आदी प्रश्‍न, हिंदुत्व विरूद्ध अल्पसंख्यांक लढाईचे चित्र निर्माण करणे आणि शेती, कांदा, सिंचन, बेरोजगारीप्रश्‍नी प्रचारात ठोस आश्‍वासनांअभावी लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील निवडणूक जनतेच्या हाती गेली आहे. यात नरेंद्र मोदी की राहुल गांधी यांची जादू चालते हा औत्सुक्याचा विषय ठरतो आहे. ( who win in election Narendra Modi or Rahul Gandhi is matter of curiosity )

वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमचा उमेदवार रिंगणात नसल्याने धुळे लोकसभा मतदारसंघातील जातीय समीकरणे बदलली आहेत. एकीकडे कांद्याच्या निर्यातीचा प्रश्‍न भाजप- महायुतीच्या डोळ्यातून पाणी काढत असताना काँग्रेस- महाविकास आघाडी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची सहानभुती मिळविण्यासाठी सरसावली आहे. महायुती हिंदुत्व, देशाच्या सुरक्षिततेच्या मुद्यावर प्रचारात भर देत आहे. परंतु, या प्रचारात विशिष्ट समुदायाला विरोधाची किनार दिसत असल्याने निवडणुकीतील जातीय समीकरणे बदलत आहेत.

जातीय समीकरण बदलले

धुळे लोकसभा मतदारसंघात सरासरी पाच ते साडेपाच लाख मराठा- पाटील, पावणेचार लाख मुस्लीम, साडेतीन लाख आदिवासी, दीड लाख दलित मतदार आणि उर्वरित लोणी मराठा, माळी, कोळी, धनगर, वाणी, राजपूत व अन्य जातीसंवर्गाच्या मतदारांचा समावेश आहे. वंचित बहुजन आघाडी, एमआयएमचे उमेदवार रिंगणात असते, तर मुस्लीमबहुल मालेगाव व धुळे मतदारसंघात या समाजाच्या मतांचे ध्रुवीकरण होऊन भाजपच्या विजयाचा मार्ग सुकर झाला असता.

मात्र, मुस्लीम समाजाचे सरासरी ८० टक्के मतदान काँग्रेसला, तर मणिपूरप्रश्‍नी नाराज आदिवासी आणि दलित समाजातील नाराज मतदारांचीही काँग्रेसला पसंती राहण्याचे चिन्ह असल्याने काँग्रेसला ‘सेफ झोन'मध्ये असल्याचे वाटत आहे. (latest marathi news)

कुणाचा करिष्मा चालेल?

भाजप- महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुभाष भामरे प्रचारात दशकाच्या कारकिर्दीत सिंचन, पाणी, रेल्वे, दळणवळणाच्या सुविधा बळकटीकरणाच्या केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडत आहेत. प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांनी शेतीसह सर्वांगिण विकासाचा अजेंडा मतदारांपुढे ठेवला आहे. कांदा निर्यात, शेती, बेरोजगारीच्या मुद्याला नंदुरबारच्या सभेतून बगल देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, धुळ्याच्या सभेत बगल देणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अशा भूमिकेमुळे भाजप- महायुतीच्या उमेदवाराला ही नाराजी दूर सारण्याचे मोठे आव्हान पेलावे लागत आहे.

या स्थितीत देशाची सुरक्षितता, अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर नेणे, जलसिंचनाचा नार- पार प्रकल्प मार्गी लावण्यासाठी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करावे लागेल, अशा प्रचारातून महायुती मते मागत आहे. देशाच्या सर्वांगिण हितासाठी आणि जातीयवादाचा बिमोड करण्यासाठी उमेदवारांना विजयी करावे लागेल, हा काँग्रेस- महाविकास आघाडीचा प्रचाराचा मुद्दा ठरत आहे. अशा चुरशीच्या लढतीत मोदी की गांधी यापैकी कुणाचा करिष्मा निकालात परावर्तित होतो याकडे सर्वांचे लक्ष असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT