Abhinav Goel esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Ladki Bahin Yojana : महिलांनी घाईगर्दी करु नये : जिल्हाधिकारी; लाडकी बहीण साठी 31 ऑगस्टपर्यंत नोंदणी

Ladki Bahin Yojana : ३१ ऑगस्टपर्यंत नोंदणी सुरू राहणार असून योजनेच्या लाभापासून एकही महिला वंचित राहणार नाही यासाठी दक्षता घेतली जाणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना लागू केल्यानंतर शहरासह जिल्ह्यातील सेतू, ई- सेवा केंद्रांवर महिलांची अर्जासाठी मोठी गर्दी उसळत आहे. यासह शैक्षणिक प्रवेशामुळे विविध प्रकारचे दाखले लागणाऱ्यांची गर्दी उसळत असल्याने ई- सेवा केंद्र चालकांना कामकाजासाठी कसरत करावी लागत आहे.

या स्थितीमुळे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी महिलांना घाईगर्दी करू नये, असे आवाहन केले. तसेच ३१ ऑगस्टपर्यंत नोंदणी सुरू राहणार असून योजनेच्या लाभापासून एकही महिला वंचित राहणार नाही यासाठी दक्षता घेतली जाणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. (Dhule Collector statement Registration till 31st August for ladki bahin yojana)

महिला व मुलींच्या आर्थिक- सामाजिक पुनर्वसनासाठी एक जुलैपासून मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना लागू झाली आहे. योजनेत २१ ते ६५ वयोगटातील मुली व महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा आर्थिक लाभ मिळणार आहे. पहिल्या टप्प्याची नोंदणी ३१ ऑगस्टपर्यंत होणार आहे. त्यामुळे मुली, महिलांनी नोंदणीसाठी घाईगर्दी करण्याची आवश्यकता नाही. योजनेच्या लाभापासून जिल्ह्यातील एकही पात्र महिला वंचित राहणार नाही, असे जिल्हाधिकारी गोयल यांनी स्पष्ट केले.

अर्ज मोफत भरणार

भरलेला अर्ज अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये, सेतू सुविधा केंद्रामध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांकडून ऑनलाइन प्रविष्ट केला जाईल आणि दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोच पावती दिली जाईल. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य राहील.

योजनेच्या लाभासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी महिलांना प्राधान्याने मदत करण्यासाठी तसेच या योजनेच्या लाभासंबंधीचे काही दाखले द्यावयाचे असल्यास आपले सरकार, ई-सेवा सेतू केंद्र, तहसीलदार कार्यालयांना आवश्यक ती सूचना दिली आहे. या कामकाजात जो कुणी कुचराई करेल, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी गोयल यांनी दिला आहे. (latest marathi news)

पात्र-अपात्र लाभार्थी

पात्र महिलेस आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँक खात्यात लाभ रक्कम दिली जाईल. केंद्र व राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे पंधराशे रुपयांपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल.

२१ ते ६५ या वर्षे वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला, कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला लाभासाठी पात्र असेल. बँक खाते आवश्यक असेल. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे. मात्र, अडीच लाखांपर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत कर्मचारी, स्वंयसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

अर्जासाठी विविध सुविधा

जिल्हाधिकारी गोयल म्हणाले, की योजनेची माहिती जिल्ह्यातील सर्व महिलांपर्यंत पोचविण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे ग्राम व तालुकास्तरावर मार्गदर्शन मेळावे घेतले जातील. याबाबत आवश्यक ती सूचना यंत्रणेला दिली आहे. योजनेच्या लाभासाठीचे अर्ज हे पोर्टल, गुगल प्ले- स्टोअर, 'नारीशक्ती दूत' नामक ॲप डाऊनलोड केल्यावर पात्र महिलांना ऑनलाइन अर्ज भरता येईल.

ज्या महिलेस ऑनलाइन अर्ज सादर करता येत नसेल, त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्र, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी, ग्रामीण, आदिवासी, ग्रामपंचायत, वॉर्ड तसेच सेतू सुविधा केंद्रात उपलब्ध आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT