BJP members and supporters cheering after the election of Soni Kadam, Jyoti Borse as Speaker in Zilla Parishad. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule ZP News : सभापतीपदी कदम, बोरसेंची वर्णी; शिंदखेडा तालुक्यातील समर्थकांचा जल्लोष

Dhule ZP : जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती महाविरसिंह रावल आणि महिला व बालकल्याण सभापती संजीवनी सिसोदे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागी शिंदखेडा तालुक्यातील दोन महिला सदस्यांची निवड झाली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule ZP News : जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती महाविरसिंह रावल आणि महिला व बालकल्याण सभापती संजीवनी सिसोदे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागी शिंदखेडा तालुक्यातील दोन महिला सदस्यांची निवड झाली.

यात शिक्षण व आरोग्य सभापतीपदी खलाणे गटाच्या सदस्या सोनी पंकज कदम, तर महिला व बालकल्याण सभापतीपदी वर्षी गटाच्या सदस्या ज्योती देवीदास बोरसे यांची वर्णी लागली. (Dhule Zilla Parishad Nomination of Kadam Borse as Chairman)

त्यांची बिनविरोध निवड झाली. जिल्हा परिषदेत भाजपची एकहाती सत्ता आहे. जिल्हा परिषदेत रिक्त दोन सभापतीपदांची शुक्रवारी (ता. १) निवड प्रक्रिया झाली. भाजपतर्फे सोनी कदम, ज्योती बोरसे यांचे दोनच अर्ज दाखल झाले.

त्यांच्या बिनविरोध निवडीनंतर जिल्हा परिषद आवारात पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला. नवनिर्वाचित सभापतींचा सत्कार केला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे, उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, कृषी सभापती हर्षवर्धन दहिते. (latest marathi news)

माजी अध्यक्ष तुषार रंधे, माजी उपाध्यक्षा कुसुम निकम, महाविरसिंह रावल, संजीवनी सिसोदे, कामराज निकम, भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक बागल, सभापती रणजित गिरासे, प्रा. आर. जी. खैरनार, भारत ईशी, माजी सभापती जिजाबराव सोनवणे.

डॉ. दीपक बोरसे, भरत पवार, नारायण गिरासे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुरज देसले, जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे, आशुतोष पाटील, प्रभाकर पाटील, धनंजय मंगळे, गोकुळ परदेशी, भूपेंद्र गिरासे, लखन रुपनर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT