Dhule News : शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटावा यासाठी शासनाने अक्कलपाडा योजना मंजुरीसह भरीव निधी दिला.
मात्र, महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शहर पाण्यापासून वंचित असल्याची टीका एमआयएमचे आमदार फारूक शाह यांनी केली. (Dhulekar deprived due to municipal rulers Drinking water issue Dhule News)
ते म्हणाले, की मनपातील भाजपचे सत्ताधारी नागरिकांना दिवसाआड पाणी मिळावे यासाठी वर्षभरापासून विविध आश्वासन देत होते. प्रत्यक्षात अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचे काम कुठपर्यंत आले याबाबतची सत्य स्थिती वारंवार लपविली जात होती.
ते नागरिकांना समजावे यासाठी अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाहणी केली. अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी उचलण्यासाठी आवश्यक वीजपुरवठ्यासाठीचे ३३ केव्हीचे उपकेंद्र उभारण्याचे नियोजन उशिराने केले जात आहे.
योजना पूर्ण झाल्याचे सांगत चार महिन्यांपूर्वी भाजपच्या नेते, पदाधिकाऱ्यांकडून एकमेकांना पेढे भरविण्यात आले; परंतु नागरिकांना आजही आठ ते दहा दिवसांनंतर पाणीपुरवठा होत आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
अक्कलपाडा योजनेसाठी ३३ केव्हीचे वीज उपकेंद्र येत्या पंधरा दिवसांत कार्यान्वित करावे आणि तीन पंप सुरू करण्यात यावेत, असे निर्देश महापालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
त्यामुळे नागरिकांना किमान दोन दिवसांआड पाणीपुरवठा होऊ शकेल, असे सांगत यापूर्वी मनपाने मागणी केल्यानुसार जलकुंभांचे छत, शहरातील वितरण व्यवस्था सक्षम करण्यासाठी व्हॉल्व्ह, काही ठिकाणी नवीन जलवाहिनीसाठी राज्य शासनाकडून पाच कोटी रुपये उपलब्ध करून देऊ, असे आमदार शाह यांनी सांगितले.
मनपा उपायुक्त विजय सनेर, अभियंता कैलास शिंदे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता वानखेडे, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता भामरे, डॉ. दीपश्री नाईक, नगरसेवक नासिर पठाण, नगरसेवक सईद बेग, जावेद मिर्झा, आसिफ मुल्ला, आसिफ शाह, इब्राहिम पठाण, फिरोज शाह आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.