Nandurbar News : सातत्याने अवकाळी पावसामुळे शेतकरी व सर्व सामान्य नागरिकांवर नैसर्गिक आपत्तीचे संकट आले असताना दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतर्फे वीज ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेव नावावर एक प्रकारे मोठा भुर्दंड लावण्यात आल्याने वीज ग्राहकांमध्ये नाराजी पसरली आहे. (Dissatisfaction among consumers due to extra charge on electricity bill by msedcl Nandurbar News)
महाराष्ट्र विद्युत नियमक आयोगाच्या विद्युत पुरवठा समितीनुसार वीज ग्राहकांकडून सुरक्षा ठेव आकारण्यात येते. दरवर्षी सुरक्षा ठेवीची पुनर्गणना करण्यात येते. वीज ग्राहकांना एप्रिल महिन्यामध्ये विजेच्या बिलासोबत स्वतंत्र अतिरिक्त सुरक्षा ठेवचे बिल देण्यात येत आहे. सदरचे बिल साधारण: तीनशे रुपयांपासून तर पाच हजार रुपयांपेक्षाही जास्त आहे.
त्यामुळे वीज ग्राहक संभ्रमात पडले आहेत. वीज बिल भरावे की अतिरिक्त सुरक्षा ठेव बिल भरावे या संभ्रमात आहेत. सध्याची परिस्थिती बघता विद्युत वितरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन वीज ग्राहकांना सवलत देण्यात यावी अशी मागणी आहे. विद्युत वितरण विभागातर्फे रक्कम भरण्यासाठी सहा मासिक हप्त्यांची सुविधा उपलब्ध केली आहे, मात्र अतिरिक्त सुरक्षा ठेव रक्कम रद्द करण्यात यावी अशी मागणी आहे.
वीज ग्राहकांची सुरक्षा ठेव सरासरी मासिक बिलाच्या दुप्पट आणि त्रैमासिक असेल तर सरासरी बिल आकारण्यात आले आहे. वीज ग्राहकांना याबाबत हप्त्यात रक्कम भरण्याची देखील सवलत देण्यात आली आहे. विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार अतिरिक्त सुरक्षा ठेवची बिले आकारण्यात आली आहेत अशी माहिती शहादा विद्युत वितरण विभागाचे उपअभियंता-सुजित पाटील यांनी दिली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.