Harshvardhan Dahit and Kavita Dahit present during the puja at Shri Ram Temple on Agra Road esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : धुळ्यात साडेतीन हजार लाडूंचा प्रसाद

अयोध्येतील श्रीराममूर्ती आणि कार्यक्रमाचे थेट प्रसारण मोठ्या पडद्यावर पाहताना धन्य वाटले, अशी भावना शेकडो नागरिकांनी व्यक्त केली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : अयोध्येतील श्री रामलल्ला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास आणि मंदिर लोकार्पण कार्यक्रमास उपस्थितीची अनुभूती आम्ही घेतली.

अयोध्येतील श्रीराममूर्ती आणि कार्यक्रमाचे थेट प्रसारण मोठ्या पडद्यावर पाहताना धन्य वाटले, अशी भावना शेकडो नागरिकांनी व्यक्त केली.

दरम्यान, साडेतीन हजार लाडवांचा प्रसादवाटप करताना श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे नागरिकांना दर्शन घडविल्याचे समाधान आहे, अशी भावना जिल्हा परिषदेचे कृषी सभापती, जिल्हा बँक संचालक हर्षवर्धन दहिते यांनी व्यक्त केली.

अयोध्येतील कार्यक्रमापूर्वी दहा दिवस अगोदर जिल्हा परिषदेचे कृषी सभापती हर्षवर्धन दहिते यांच्यातर्फे धुळे लोकसभा मतदारसंघात श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीची शोभायात्रा निघाली.

तसेच सोमवारी (ता. २२) सायंकाळी धुळे शहरातील प्राचीन श्रीराम मंदिरात सभापती दहिते आणि कविता दहिते यांच्या हस्ते महाआरती झाली. अयोध्येत जन्मभूमीस्थळी मंदिर साकारून २२ जानेवारीला श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपालांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. तो पाहणे सर्वांना शक्य होणार नाही हे लक्षात घेत सभापती दहिते यांनी मंदिराच्या प्रतिकृतीची शोभायात्रा काढून धुळे लोकसभा मतदारसंघात दर्शन घडविले.

मतदारसंघातील प्रमुख बहुसंख्य गावांमध्ये ही शोभायात्रा पोचली. अनेक गावांमध्ये मंदिराच्या प्रतिकृतीवर फुलांचा वर्षाव झाला. महिलांनी मंगलकलशद्वारे शोभायात्रेचे स्वागत केले. आबालवृद्ध शोभायात्रेच्या आगमनावेळी भजनसंध्येसह अन्य आध्यत्मिक कार्यक्रमात रमले.

आरती व लाडवांचा प्रसाद

अयोध्येत श्रीराममूर्तीची स्थापना होत असताना २२ जानेवारीला सभापती दहिते यांच्या नेतृत्वात मंदिर प्रतिकृतीची शोभायात्रा धुळे शहरात पोचली. तीत भाविकांसह अधिक महिला सहभागी झाल्या.

मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहिल्याची अनुभूती नागरिकांना घेता यावी यासाठी सभापती दहिते यांनी श्रीराम मंदिर चौकाजवळ मोठ्या आकाराचा पडदा उभारून त्यावर सोहळ्याचे दर्शन घडविले.

सायंकाळी आतषबाजीनंतर सभापती दहिते आणि सौ. दहिते यांच्या हस्ते महाआरती झाली. भाविकांना साडेतीन हजार लाडवांचा प्रसादवाटप केला.

नंतर शहरातील फुलवाला चौक, स्वस्तिक चौक, नेहरूनगर, जयहिंद सीनिअर कॉलेज चौक, जयहिंद ज्युनिअर कॉलेज चौक, इंदिरा गार्डन, स्वामी मंदिरामार्गे रेऊनगर येथे शोभायात्रेचा समारोप झाला.

बलिदान दिलेल्यांपुढे नतमस्तक

या संदर्भात प्रतिक्रिया देताना सभापती हर्षवर्धन दहिते म्हणाले, की अनेकांनी अयोध्येतील मंदिर उभारणीसाठी बलिदान दिले. त्यांच्यापुढे नतमस्तक होतो. श्रीरामाच्या जन्मस्थळी मंदिर व्हावे यासाठी पाचशे वर्षे संघर्ष करावा लागला.

सकल हिंदू समाजासाठी प्रभू श्रीरामचंद्र हे अस्मिता आहेत. अयोध्येतील मंदिराचे लोकार्पण पाहता यावे यासाठी धुळ्यात भव्यदिव्य पडद्यावर दर्शन घडवीत लाडवांचा प्रसाद भाविकांना देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT