Revenue Collection esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : जिल्हा महसूल यंत्रणेचा विक्रम; शासनाच्या तिजोरीत 63 कोटी

सकाळ वृत्तसेवा

धुळे : जमीन महसूल (Revenue) आणि गौण खनिजातून ३१ मार्चअखेर ६३ कोटी २५ लाख २४ हजारांचा महसूल जिल्हा प्रशासनाने प्राप्त केला. त्यामुळे शासनाच्या तिजोरीत भर पडली. (district administration received revenue of 63 crore at end of March 31 from land revenue and minor minerals dhule news)

दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत १००.३१ टक्के महसूल मिळविण्याचे कामकाज जिल्हा महसूल प्रशासनाने केले. धुळे ग्रामीणने ११६.९४ टक्के महसूल वसुली केली आहे. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या मार्गदर्शनासह सहकार्याने हे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.

मार्चअखेर महसूल प्रशासनाने शेतसारा, शेतजमीन एनए करताना भरावे लागणारे शुल्क, वतन, सरंजामनिहाय भरून घेतलेली नजराणा रक्कम, इतर गौण खनिजांचे कर संकलित करताना काटेकोर नियोजन केले. करवसुलीचे काम कोतवाल, तलाठी, मंडल अधिकारी यांनी केले. सात-बारा, आठ अ उतारे घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांकडून शेतसारा, शिक्षण कर वसूल केल्यानंतरच त्यांची कामे पूर्ण केली. त्यामुळे १००.३१ टक्के वसुली करत नवीन विक्रम प्रस्थापित केला.

उपविभाग सरस

जिल्ह्यात दगडखाणी, डेब्रिज, माती, रेतीचे उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या उत्खननातून ९७.७८ टक्के उत्पन्न मिळाले. प्रपत्र अ जमीन कर महसुलासाठी, प्रपत्र ब गौण खनिजसाठी असे महसूल वसुलीचे उद्दिष्ट दिले होते. धुळे उपविभागातून सर्वाधिक महसूल वसूल झाला.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपलब्ध माहितीनुसार जिल्ह्यातील दोन प्रशासकीय उपविभागातील आठ तहसील व अपर तहसील कार्यालये मिळून २०२२-२०२३ साठी जमीन महसूल व गौण खनिज करातून ६३ कोटी सहा लाखांचे वसुली उद्दिष्ट देण्यात आले होते. यात जमीन महसुलातून २९ कोटी २६ लाख, तर गौण खनिजातून ३३ कोटी ८० लाख महसूल वसुलीचे उद्दिष्ट मिळाले होते.

३१ मार्चअखेर जमीन व गौण खनिजातून सुमारे ६३ कोटी २५ लाख २४ हजारांचा महसूल गोळा करण्यात जिल्ह्यातील आठ तहसील व अपर तहसील कार्यालयांना यश मिळाले. जमीन महसुलातून ३० कोटी २० लाख ३४ हजार महसूल प्राप्त झाला. गौण खनिजातून ३३ कोटी चार लाख ९० हजार महसूल मिळाला.

तहसीलनिहाय महसूल वसुली (लाखांत)

* तहसील ......... वसुली ......... टक्केवारी

* धुळे ग्रामीण ......... १५३३.१६ ......... ११६.९४

* धुळे शहर ......... ६५४.२१ ......... ७७.२४

* साक्री ......... ९८२.१६ ......... १०६.५२

* पिंपळनेर ......... ६५८.४९ ......... १०५.८७

* शिरपूर ......... ९८४.७९ ......... ९३.३५

* शिंदखेडा ......... ९४९.०३ ......... ९७.८४

* दोंडाईचा ......... ५६३.४० ......... ९५.४९

* एकूण ......... ६३२५.२४ ......... १००.३११

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्रामधील मतमोजणीपूर्वी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात जिलेबी बनवण्याची तयारी सुरु

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT