Shrikant Dhiware buying a calendar from a disabled couple at the Superintendent of Police office on Monday. Neighbor Dattatreya Shinde.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News: पोलिसातील संवेदनशीलता दिव्यांगांच्या मदतीला! जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून सहृदयतेचा संदेश

सकाळ वृत्तसेवा

Dhule News: ‘खाकी’वर्दी केवळ कायदा-नियमांचे पालन करीत केवळ कर्तव्य बजावत नाही तर त्यांच्यात देखील माणुसकी, समाजाप्रती संवेदनशीलता दडलेली असते. याचाच प्रत्यय जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या माध्यमातून आला. शहरातील एका दृष्टिहीन व्यक्तीकडील सर्व दिनदर्शिका खरेदी करून पोलिस अधीक्षक धिवरे यांनी समाजाला सहृदयतेचा संदेश दिला आहे.

पोलिस अधीक्षक धिवरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हा पोलिस दलासह कायदा व सुव्यवस्था स्थितीत बदल होत आहे. (District Superintendent of Police Shrikant Dhivare buy calendar from disabled couple dhule news)

गुन्हेगार, अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहे. बेकायदेशीर उद्योग करणाऱ्यांना ‘सळो की पळो’ करून सोडले आहे. बेशिस्तांना शिस्त लावताना ते कठोर भासतात. मात्र, पोलिस अधीक्षक धिवरे यांच्यात दडलेल्या सहृदयी व्यक्तिमत्त्वाची झलक वेळोवेळी दिसत आहे.

कौतुकाचाही वर्षाव

यापूर्वी आयटीबीपीत निवड झालेल्या सोनगीर (ता. धुळे) येथील दोघा तरुणांचा त्यांनी कार्यालयात बोलावून सत्कार केला. नंतर दोनच दिवसांपूर्वी महिलेची गहाळ झालेली दागिन्यांची बॅग परत करणाऱ्या युवकाच्या प्रामाणिकतेचे त्यांनी मुक्तपणे कौतुक केले.

अशात शहरातील वर्दळीच्या मार्गावर नेत्रहीन बासरीवादक रोहिदास आल्हाद हे अनेकांना रोज दिसतात. शहरवासीयांना ते चांगले परिचित आहेत. वाटसरू श्री. आल्हाद यांची बासरी वादनाची मधूर कला बघून मंत्रमुग्ध होतात. तसेच कलेची कदर करणारा त्याच्यापरीने लगेच सहकार्यही करतो. अनेकदा त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी असतात. त्यादेखील दिव्यांग आहेत.

दिनदर्शिकेतून आटापिटा

सध्या हे दांपत्य दिनदर्शिका विक्रीतून चरितार्थासाठी दोन पैसे जोडण्याचा आटापिटा करीत आहे. यासंबंधीची माहिती पोलिस अधीक्षक धिवरे यांना मिळाली. त्यांनी दिव्यांग रोहिदास आल्हाद यांची सोमवारी (ता. १८) प्रत्यक्ष भेट घेतली. त्यावेळी श्री. आल्हाद यांनी बासरी वादनाची कला श्री. धिवरे यांच्यासमोर सादर केली. त्यावर पोलिस अधीक्षकांनी श्री. आल्हाद यांचे मुक्तकंठाने कौतुक केले.

एवढेच नव्हे तर त्यांनी श्री. आल्हाद यांच्याकडील सर्व दिनदर्शिका खरेदी करून त्यांना पाच हजार रुपयांची मदत केली. हे सर्व काही अनपेक्षितपणे घडल्याने दिव्यांग दांपत्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडला. पोलिस अधीक्षक धिवरे यांनी दाखविलेल्या सहृदयतेमुळे पोलिस दलाची प्रतिमा जनमानसात आणखीनच उजळली. शिवाय, खाकी वर्दीत लपलेली माणुसकीदेखील मदतीला धावून जाते, असा संदेश या माध्यमाद्वारे जनमानसात पोचला. याप्रसंगी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रेय शिंदे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT