Dr. Babasaheb Ambedkar Rural and Urban Development Project, Dhule and other dignitaries on the occasion of distribution of grocery kits to the elderly by FirstCry organization. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : सव्वाशे वृद्धांना दिवाळी किराणा किट, गरम कपडे; फर्स्टक्राय संस्थेचा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : समता शिक्षण संस्था, पुणे संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प, धुळे व फर्स्टक्राय संस्था, पुणे यांच्यातर्फे कुंडाणे, मोराणे येथे १२५ ज्येष्ठांना दिवाळी किराणा किट तसेच गरम कपड्यांचे वाटप करण्यात आले.

१० ऑक्टोबरला कुंडाणे येथील विश्वासनगर, आदिवासी वस्ती, मोराणे उपनगर येथे ५० वृद्धांना दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर तीन महिने पुरेल इतका किराणा किट वाटप करण्यात आले. (Diwali grocery kits warm clothes to 700 elderly initiative of FirstCry)

यात दहा किलो गहू, तीन किलो तेल, दोन किलो शेंगदाणे, दोन किलो हरभराडाळ, एक किलो तूरडाळ, एक किलो मठ, दोन किलो गूळ, दोन किलो साखर, एक किलो पोहे, एक किलो रवा, अर्धा किलो खोबरे इत्यादी किराण्याचा समावेश आहे. समता शिक्षण संस्थेचे सचिव व डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प धुळेचे संचालक डॉ. जालिंदर अडसुळे अध्यक्षस्थानी होते.

फर्स्टक्राय संस्थेचे प्रतिनिधी किरण चिंदरकर प्रमुख पाहुणे होते. निवृत्त प्रा. आरती बरिदे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास व संशोधन केंद्राचे संचालक डॉ. प्रा. शोभा शिंदे उपस्थित होते.

तसेच १४ ऑक्टोबरला हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर थंडीपासून वृद्धांचा बचाव व्हावा यासाठी प्रकल्पातील मोराणे उपनगर येथील पारधीवाडा, भिल्ल वस्ती, कुंडाणे येथील विश्वासनगर, मातंग वस्ती, नाचक वस्ती, राममंदिर परिसर येथील ७५ वृद्धांना स्वेटर, चादर, चटई, ब्लँकेट वाटप करण्यात आले.

मोराणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रघुनाथ महाजन, सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रीती वाहणे, आरोग्य पर्यवेक्षक सुनंदा निकम, सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय जाधव, मोराणेचे पोलिसपाटील कैलास झोडगे आदी उपस्थित होते.

आधार देण्याचा प्रयत्न

या प्रकल्पाच्या माध्यमातून वृद्धांना सामाजिक आधार देण्याचा, वृद्धांचा आरोग्याचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न असून, असे उपक्रम गरजेचे असल्याचे डॉ. अडसुळे म्हणाले. दिवाळीचा सण जवळ असून, वृद्धांना प्रकल्पाने किराण्याचा खजिना दिल्याचे प्रा. डॉ. शिंदे म्हणाल्या.

सायजाबाई गायकवाड, मायाबाई अमृतसागर, आखाडू गायकवाड, लीलाबाई भिल या वृद्धांनी विविध स्थानिक गाणी गायली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्पाच्या समन्वयक प्रा. रचना अडसुळे यांनी या कार्यक्रमांचे संयोजन व प्रास्ताविक केले.

प्रकल्पाच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. सुनीता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम अधिकारी गणेश उफाडे यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी विशाल भदाणे, सुभाष बागूल, सायली कडू, रवींद्र कदम, लक्ष्मण पवार, सुनील ढेगळे, रेखा उफाडे यांचे सहकार्य लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT