jalaj sharma and sanjay barkund esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : कामे सोडून अफवांना बळी पडू नका; जिल्हाधिकारी जलज शर्मांचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : पोलिस आणि जिल्हा प्रशासन नागरिकांच्या सोबत आहे. दैनंदिन कामे सोडून कुणीही अफवांना बळी पडू नका, अफवांच्या मागे धावू नका, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी केले. (Do not fall prey to rumours District Collector District Superintendent of Police appeals dhule news)

जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले, की शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांतील घटना पाहिल्या तर शांततेवर परिणाम होईल, असा प्रभाव दिसत आहे. मात्र, नागरिकांनी काळजी करू नये. घाबरून जाऊ नये. जिल्हा पोलिस दल नागरिकांच्या सोबत आहे.

सर्वप्रथम अफवा, गैरसमजुतीला बळी पडू नका. सोशल मीडियावरील फेक न्यूज, मेसेजेसला बळी पडू नका. कुठल्याही मजकूर, न्यूज, मेसेजची खात्री केल्याशिवाय ते व्हायरल करू नका. माहितीच्या अधिकृत स्रोतावर विश्‍वास ठेवा. प्रशासन व शासकीय माध्यमांवर विश्‍वास ठेवा.

इतर माहितीवर विश्‍वास ठेवू नका. कुठल्याही फेक आवाहन, निवेदनाला बळी पडू नका. कामे सोडून अफवांच्या मागे न धावता शांतता भंग होईल अशा कुठल्याही गोष्टीत सहभाग नोंदवू नका. शांतता अबाधित राहण्यासाठी अधिकाऱ्यांना सहकार्य करावे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पोलिसांना मदत करावी. कुठलीही माहिती जी शासकीय यंत्रणेसाठी उपयोगी ठरेल ती पोलिस ठाणे, जिल्हाधिकारी कार्यालयास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शर्मा यांनी केले.

बारकुंड यांचे आवाह

पोलिस अधीक्षक बारकुंड यांनी सांगितले, की धुळ्यात सध्या शांतता आहे. अशीच शांतता अबाधित राहण्यासाठी सर्व लोकांनी सहकार्य करावे. कोणीही कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. सत्य परिस्थितीची आपण पडताळणी करावी.

शनिवारी निघणाऱ्या मिरवणुकीबाबत पोलिस यंत्रणा सक्षम आहे. धुळे शहरात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सीआरपीसी १४४ (२)नुसार मनाई आदेश पारीत करण्यात आला आहे. योग्य तो पोलिस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. नागरिकांनी शांतता पाळावी व अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT