dhule market committee esakal
उत्तर महाराष्ट्र

Dondaicha Market Committee Election : 156 उमेदवारांची माघार, 34 रिंगणात

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : दोंडाईचा (ता. शिंदखेडा) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी गुरुवारी (ता. २०) उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी १५६ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्यानंतर आता १६ जागांसाठी ३४ उमेदवारी निवडणूक रिंगणात आहेत.

भारतीय जनता पक्षाचा जयकिसान पॅनल व महाविकास आघाडीच्या शेतकरी परिवर्तन पॅनलमध्ये सरळ लढत होणार आहे. (dondaicha Market Committee 34 candidates are in election for 16 seats dhule news)

बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत (कंसात आजपर्यंत माघारी संख्या) सेवा सहकारी संस्था एकूण ११ जागांसाठी त्यात सर्वसाधारण ७ जागांसाठी १५ अर्ज (माघारी अर्ज ७७), महिला राखीव २ जागांसाठी ४ अर्ज (माघारी १३), इतर मागास वर्ग एका जागेसाठी २ अर्ज (माघारी १२) व विमुक्त जाती/भटक्या जमाती १ जागासाठी २ अर्ज (माघारी ७),

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

ग्रामपंचायत मतदारसंघाच्या एकूण ४ जागा असून, त्यात सर्वसाधारण २ जागांसाठी ४ अर्ज (माघारी २८), अनुसूचित जाती-जमाती एका जागेसाठी २ अर्ज (माघारी ९) व आर्थिक दुर्बलच्या एका जागेसाठी २ अर्ज (माघारी ३) व हमाल-तोलारी मतदारसंघाच्या एका जागेसाठी ३ उमेदवारी अर्ज (माघारी ७) अशा एकूण १६ जागांसाठी ३४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. बुधवारी (ता. १९) व्यापारी-अडते मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे रोशन टाटिया व राहुल कवाड हे बिनविरोध निवडून आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: डोंबिवलीत रवींद्र चव्हाण आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT