dhule market committee esakal
उत्तर महाराष्ट्र

Dondaicha Market Committee : भाजपला शिट्टी, तर महाविकास आघाडीला कपबशी

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : दोंडाईचा (ता. शिंदखेडा) कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक शुक्रवारी (ता. २१) उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, चिन्हवाटपदेखील करण्यात आले आहे. (Dondaicha Market Committee BJP given whistle and Maha Vikas Aghadi given cup symbol dhule news)

भारतीय जनता पक्षाच्या जयकिसान पॅनलाच्या उमेदवारांना शिटी, तर महाविकास आघाडीच्या शेतकरी परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना कपबशी चिन्ह देण्यात आले.

भाजपचे सर्वसाधारण सेवा सहकारी संस्थेतील उमेदवार ः जयसिंह गिरासे, दगडू गिरासे, प्रमोद पवार, किशोर पाटील, जिजाबराव पाटील, नारायण पाटील व मोतीलाल वारुडे.

महाविकास आघाडीचे उमेदवार : नारायण चव्हाण, महेंद्र देसले, नरेंद्र पाटील, विजय पाटील, हेमराज पाटील, जयवंतराव बोरसे, धनराज भामरे.

या मतदारसंघात संदीप दयाराम थोरात (चिन्ह पंखा) अपक्ष उमेदवार असून, या ठिकाणीदेखील सरळ लढत होत आहे. सेवा सहकारी संस्थेच्या महिला दोन जागांसाठी सरळ लढत होत असून, भाजपतर्फे वैशाली पवार व स्नेहल बागल या उमेदवार आहेत, तर महाविकास आघाडीकडून कोकिळाबाई पाटील व विद्याबाई पाटील उमेदवार आहेत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सेवा सहकारी संस्थेच्या इतर मागासवर्गीय मतदारसंघाच्या एका जागेसाठी दोन उमेदवार असून, भाजपतर्फे रमेश खैरनार, तर महाविकास आघाडीतर्फे प्रकाश पाटील आहेत. सेवा सहकारी संस्थेच्या भटक्या जमाती/विमुक्त जातीच्या एका जागेसाठी दोन उमेदवार असून, यात भाजपतर्फे साहेबराव पेंढारकर, तर महाविकास आघाडीतून भाईदास धनगर हे उमेदवार आहेत.

ग्रामपंचायत मतदारसंघाच्या दोन जागांसाठी चार उमेदवार असून, भाजपतर्फे संजय ठाकरे व दीपक बोरसे उमेदवार आहेत, तर महाविकास आघाडीकडून भाईदास पाटील व ललित वारुडे आहेत. ग्रामपंचायत मतदारसंघ अनुसूचित जाती-जमातीच्या एका जागेसाठी ग्रामपंचायत अनुसूचित जमातीसाठीच्या एका जागेसाठी दोन उमेदवार असून, भाजपतर्फे दादाभाऊ सोनवणे, तर आघाडीतर्फे देवीदास मोरे उमेदवार आहेत.

आर्थिक दुर्बल घटकांच्या एका जागेसाठी दोन उमेदवार असून, भाजपतर्फे आत्माराम पाटील, तर आघाडीतर्फे भगवंतराव सोनवणे हे उमेदवार आहेत. हमाल व तोलारी मतदारसंघात तीन उमेदवार असून, भाजपतर्फे एकनाथ कथू नाईक, तर आघाडीकडून अर्जुन मालचे, तर अपक्ष म्हणून रतन भिल (चिन्ह रिक्षा) हे उमेदवार आहेत.

१६ जागांसाठी ३४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. शुक्रवारी चिन्हवाटपानंतर दोन्ही पक्षांना प्रचारासाठी अवघे सात दिवस मिळणार असून, २८ एप्रिलला शिंदखेडा येथे वरपाडा रोडवरील जिल्हा परिषद शाळेत मतदान होणार असून, २९ एप्रिलला मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनोज चौधरी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गिरीश महाले यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khanapur Assembly Election 2024 Results : सुहास बाबर यांना विक्रमी 27 हजाराचे मताधिक्य; तानाजीराव पाटील ठरले किंगमेकर!

Wani Assembly Election Results 2024 : वणी मतदारसंघात शिवसेनेची मशाल पेटली! संजय देरकरांचा दणक्यात विजय

Raju Navghare Won Wasmat Assembly Election 2024 Result : दुरंगी लढतीत राजू नवघरे विजयी; जयप्रकाश दांडेगावकर यांचा पराभव

Aurangabad West Assembly Election 2024 Result Live: शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीत संजय शिरसाटांनी राखला गड

Mahesh Choughule Won in Bhiwandi West Assembly Election : भिवंडी पश्चिम मतदार संघावर तिसऱ्यांदा भाजपचा झेंडा; महेश चौघुलेंची बाजी

SCROLL FOR NEXT