Dhule News : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक तथा देशातील प्रथितयश मूत्ररोगतज्ज्ञ डॉ. आशिष पाटील यांच्या आणखी एका संशोधनाला पेटंट मिळाले आहे. त्यामुळे खानदेशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला.
डॉ. पाटील यांच्या नावावर आता एकूण सात पेटंट झाले आहेत. त्यामुळे ते देशातील सात पेटंट प्राप्त करणारे एकमेव डॉक्टर ठरले आहेत.()
पीसीएनएल या एक टाका मूतखड्याच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णाच्या पाठीतून किडणीपर्यंत जाण्यासाठी दुर्बीण टाकावी लागते. दुर्बीण टाकण्यासाठी रुग्णाच्या पाठीवर अचूक ठिकाणी जागा करावी लागते, त्यासाठीचे हे संशोधन आहे. हे त्रिकोणमिती प्रणालीवर तयार करण्यात आलेले आहे.
A PERCUTANEOUS ACCESS DEVICE FOR THE EXACT PUNCTURE OF THE PELVICALYCEAL SYSTEM असे या संशोधनाचे नाव आहे. पीसीएनएल करत असताना रुग्णाच्या पाठीवर दुर्बीण टाकण्यासाठी अचूक जागा, अशा पद्धतीने करावी लागते, जेणेकरून ती बरोबर किडनीपर्यंत मूतखडा असलेल्या जागेवर जाईल.
दुर्बीण टाकण्यासाठी अशा प्रकारच्या अचूक ठिकाणी जागा करण्यासाठी सर्जनला खूप सरावाची गरज असते. अनेक वेळा पीसीएनएल केल्यानंतर सर्जनला अचूकपणे दुर्बीण टाकण्यासाठी जागा करता येते. नेमकी हीच गरज ओळखून डॉ. पाटील यांनी हे संशोधन केले आहे.
फ्रेम केली विकसित
या संशोधनामुळे नवोदित सर्जन यांना कमी वेळेत पीसीएनएल करण्यासाठी दुर्बीण टाकण्यासाठी अचूक ठिकाणी जागा करता येणार आहे. यासाठी डॉ. पाटील यांनी ऑपरेशन टेबलावर लावता येईल, अशी एक फ्रेम विकसित केली आहे. त्यावर रुग्णाला झोपविण्यात येते.
या फ्रेमच्या सहाय्याने सर्जन रुग्णाच्या पाठीवर दुर्बीण जाण्यासाठी अचूक ठिकाणी जागा करू शकतो, असा दावा डॉ. पाटील यांनी संशोधनाच्या माध्यमातून केला आहे. पेटंटसाठी सर्व चाचण्यांमध्ये डॉ. पाटील यांचे दावे सिद्ध झाले. त्यानंतर पेटंट कार्यालयाने पेटंट प्रमाणित केले आहे. डॉ. पाटील यांना सातवे पेटंट मिळाल्याने त्यांच्यावर देश-विदेशातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
''नवोदित सर्जनला पीसीएनएलचे गुण चुटकीसरशी आत्मसात करता यावे, या उद्देशाने हे संशोधन आहे. याद्वारे नवोदित सर्जनलाही अचूकपणे रुग्णांच्या पाठीवर दुर्बीण टाकण्यासाठी जागा करता येणार आहे. त्यामुळे सर्जनचा आत्मविश्वासवाढीस मोठी मदत होणार आहे.''-डॉ. आशिष पाटील, मूत्ररोगतज्ज्ञ, धुळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.