While inaugurating Police Dadaha Setu Center, Minister Dr. Vijayakumar Village. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News: जनता-शासन-प्रशासनात सुसंवाद वाढणार : डॉ. विजयकुमार गावित

क्कलकुवा येथे ‘पोलिस दादाहा सेतू’चे उद्‍घा‍टन

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : नंदुरबार जिल्हा आपल्या निर्मितीचे रौप्यमहोत्सवी वर्ष साजरा करतो आहे, त्यामुळे अनेक बाबींचे सिंहावलोकन करत असताना जिल्हा विकासातडे झेपावत असला, तरी अनेक वैयक्तिक लाभाच्या कामांसाठी नागरिकांना आजही जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी पायपीट करत यावे लागते;

परंतु ‘पोलिस दादाहा सेतू’मुळे लोकांची होणारी पायपीट थांबणार असून, जनता व शासन-प्रशासनात सुसंवाद वाढीस लागणार आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री विजयकुमार गावित यांनी केले. (Dr Vijayakumar gavit statement Harmony will increase in public governance administration Nandurbar News)

अक्कलकुवा येथे जिल्हा पोलिस दलातर्फे झालेल्या ‘पोलिस दादाहा सेतू’च्या उद्‍घाटनप्रसंगी ते रविवारी (ता. १०) बोलत होते.

जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, जिल्हा पकिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे, पोलिस निरीक्षक दीपक बुधवंत व परिसरातील नागरिक, पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, की गेल्या पंचवीस वर्षांत इथल्या जनतेने अनेक चढ-उतार अनुभवले आहेत. थोडे मागे वळून पाहिले तर अजूनही बराच प्रवास करायचा बाकी आहे.

जनतेला समाधान वाटेल अशा कामांची पूर्तता करणे गरजेचे आहे. येणाऱ्या काळात या भागातील दळणवळण बळकट करताना भगवान बिरसा

मुंडा योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गाव, घरापर्यंत रस्ता पोचविला जाणार असून, त्यासाठी १६ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. जलजीवन मिशनच्या माध्यमातून घराघरांत प्रत्येकाला पाणी पोचविले जाणार आहे.

दूरसंचार आणि इंटरनेटचे जाळे विस्तारित करण्यासाठी जिल्ह्यात १५० टॉवर उभारण्यात आले आहेत. प्रत्येक ग्रामपंचायत आणि सरकारी कार्यालयांना सार्वजनिक उपयोगासाठी या सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत. परिणामी या भागात शिक्षण, व्यापार, आरोग्यसेवा

विस्तारताना दिसत आहेत. अशाच प्रकारे या भागात वीजपुरवठा सक्षम करण्यासाठी सुरवाडे आणि नवापूर येथे १३२ केव्ही क्षमतेचे विद्युत फीडर मंजूर करण्यात आले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकारात्मक वातावरणनिर्मितीसाठी ‘सोशल पोलिसिंग’: पी. आर. पाटील

जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील म्हणाले, की गुन्हेगारी नियंत्रणात आणताना पोलिसांबद्दल एक प्रकारचे दहशतीचे व नकारात्मक वातावरण

समाजात निर्माण झालेले दिसून येते. हे वातावरण सकारात्मकतेत बदलण्यासाठी जिल्हा पोलिस दलाने गेल्या वर्षभरात अनेक ‘सोशल पोलिसिंग’चे उपक्रम राबविले. त्यात ऑपरेश दक्षताच्या माध्यमातून ४० बालविवाह रोखले, अमली पदार्थमुक्त जिल्हा होण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

गणेशोत्सव व सण, उत्सवाच्या वेळी नागरिकांच्या मदतीने सामाजिक सलोखा राखण्यात यश मिळविले. श्रमदान, वृक्षलागवड यांसारख्या उपक्रमाच्या माध्यमातून पोलिस हे समाजाचे मित्र

असल्याची भावना निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला. ‘पोलिस दादाहा सेतू’ हा उपक्रम असाच एक नागरिक आणि शासन-प्रशासनात संवादाचा सेतू बनून काम करण्याचा उपक्रम आहे.

पोलिस यंत्रणेच्या माध्यमातून या सेतू केंद्रातून घरपोच व कुठलेही शुल्क न घेता दाखले व कागदपत्रे पोचविली जाणार आहेत.

पहिल्याच दिवशी दाखल्यांचे वितरण

-उत्पन्नाचे दाखले ५

-अधिवास व राष्ट्रीयत्व दाखला ४

-३३ महिला आरक्षण प्रमाणपत्र १

-चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रे १७

-जातीचे दाखले ८

-रेशन कार्ड ४

-आभा कार्ड ३८

एकूण ः ७७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT