Nandurbar News : जिल्ह्यातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करण्याचे धोरण अंगीकारले असून, बचतगटांना त्यांच्या आवडीच्या प्रक्रिया उद्योगासाठी प्रोत्साहन देण्यासह रोजगारनिर्मितीला चालना देण्यात आल्याचे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले. (Dr Vijayakumar gavit statement of All help for overall development of women nandurbar news )
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, नंदुरबार व तळोदा यांच्यातर्फे झालेल्या शेळीगट निवडपत्र वाटपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हीना गावित, जिल्हा परिषद सदस्या अर्चना गावित, जयश्री गावित, प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार (नंदुरबार), मंदार पत्की (तळोदा) यांच्यासह संबंधित अधिकारी व बचगटांच्या महिला हजर होत्या.
मंत्री डॉ. गावित म्हणाले, की रोजगारासाठी परराज्यात येथील मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी त्यांना महिला बचतगटांच्या माध्यमातून गावातच प्रक्रिया उद्योगासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील अक्कलकुवा, धडगावसारख्या दुर्गम भागातील तीन हजार महिलांना सव्वाआठ कोटी रुपये आजपर्यंत वितरित करण्यात आले आहेत. आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून बचगटासाठी महूफुलावर प्रक्रिया करून चॉकलेट, बिस्किटे, लाडू बनविण्यासाठी एक कोटी रुपयांचे वितरण करण्यात येत आहे.
तोरणमाळ, साक्रीसारख्या परिसरातून ज्वारी, बाजरी, भगर यांसारख्या पदार्थांच्या प्रक्रिया उद्योगांनाही अनुदान देण्यात आले आहे. जानेवारीअखेरपर्यंत प्रत्येक बचतगटास दहा हजार रुपये अनुदानरूपाने वितरित केले जाणार आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण, दुर्गम भागात विद्युतीकरण करण्यासाठी सुमारे २७ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून, घरोघरी वीज, जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाणी, गॅसजोडणीयाराख्या आवश्यक गरजांची पूर्ती शासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे, असेही मंत्री डॉ. गावित यांनी सांगितले.
डॉ. सुप्रिया गावित यांनी प्रत्येक महिलेला स्वबळावर उभे करण्याचे आमचे ध्येय आहे, असे सांगत महिलांना उज्ज्वला गॅस, जलजीवन मिशन, हर घर जल योजना, हर घर बिजली वगैरे योजनांचे महत्त्व समजावले.
खासदार डॉ. हीना गावित म्हणाल्या, की लोणचे, पापड, शेवया अशा पारंपरिक खाद्यपदार्थांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन बनविले आणि विकले तर मोठा गृहोद्योग महिलांचा आधार बनू शकतो.
त्याचबरोबर घरात साठविलेल्या कांद्याची पावडर बनविण्यासारख्या नव्या उद्योग-व्यवसायांची उभारणी महिला करू शकतात, म्हणून केंद्र सरकारने विविध योजना दिल्या आहेत. त्याला आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आदिवासी विकास विभागाच्या निधीची जोड दिली आहे, त्याचा लाभ आपल्या भागातील समस्त महिलांनी घ्यावा, असे आवाहन या वेळी केले.
निधीचे वितरण
या वेळी नंदुरबार प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील १६ गटांना शेळीगट निवडपत्र आणि एका कंपनी गटाला प्रक्रिया उद्योगासाठी एक कोटी रुपयांचा धनादेश, तळोदा प्रकल्प कार्यक्षेत्रातील ३१ बचतगटांना शेळीगट निवडपत्र व मत्स्यव्यवसाय कंपन्यांना प्रत्येकी एक कोटी रुपयांच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले.
दृष्टिक्षेपात
-बचतगटांच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योगासह रोजगारनिर्मितीला चालना
-दुर्गम भागातील तीन हजार महिलांना सव्वाआठ कोटींचे वितरण
-महूफुलांच्या माध्यमातून लाडू, बिस्किटे, चॉकलेट बनविण्याच्या प्रक्रिया उद्योगांना एक कोटी
-पंतप्रधान घरकुल योजनेतून सव्वा लाख घरे मंजूर
-जिल्ह्यात विद्युतीकरणासाठी २७ कोटी रुपयांचा निधी
-जलजीवन मिशनच्या माध्यमातून घरोघरी पाणी
-ज्वारी, बाजरी, भगर यांसारख्या प्रक्रिया उद्योगांनाही प्रोत्साहन
-घरकुलापासून कुठल्याही जाती-जमातीचे गरजू वंचित राहणार नाहीतत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.