Speaking at water shortage review meeting, Tribal Development Minister Dr. Vijayakumar Village esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पूर्वनियोजन आवश्यक : डॉ. विजयकुमार गावित

आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित म्हणाले, की केंद्र सरकारच्या निधीतून हर घर जल योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध आहे. प्रत्येक गावात, प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे शुद्ध पाणी दिले जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : या वर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने पाणीसाठा कमी कमी होत असून, नंदुरबार तालुक्यास आगामी काळात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

त्यामुळे टंचाईवर मात करण्यासाठी पूर्वनियोजन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसा मुंडा सभागृहात नंदुरबार तालुका पाणीटंचाईबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते.

या वेळी उपविभागीय अधिकारी विनायक महामुनी, प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार, तहसीलदार नितीन गर्जे, गटविकास अधिकारी जयवंत उगले, प्रभारी तहसीलदार राहुल मोरे उपस्थित होते. (Dr Vijayakumar gavit statement of Pre planning necessary to overcome water scarcity nandurbar news)

आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित म्हणाले, की केंद्र सरकारच्या निधीतून हर घर जल योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध आहे. प्रत्येक गावात, प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे शुद्ध पाणी दिले जात आहे.

ही योजना युद्धपातळीवर राबविली गेल्याने प्रत्येक गावात ही योजना पूर्णत्वास येत आहे. एकही घर पाण्याविना राहणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. प्रत्येक गावात मुबलक पाण्याचे स्रोत बघून त्यातून पाणी दिले जात आहे.

ज्या गावात पाण्याचे स्रोत कमी आहेत किंवा पाण्याचे स्रोत नाहीत अशा गावांमध्ये मुबलक पाणी असलेल्या विहिरी किंवा विंधन विहिरी अधिग्रहीत करून त्याच्यातून पाणी दिले जाणार आहे.

विहिरी खोलीकरण करणे, अधिग्रहीत करणे, विद्युत जोडणी करणे, विंधन विहिरी करणे अशी टंचाईबाबतची कामे प्राधान्याने करण्यासाठी या कामांचे प्रस्ताव सादर करण्याची कार्यवाही तत्काळ सुरू करावी, अशा सूचना दिल्या.

बैठकीत मंत्री डॉ. गावित यांनी प्रत्येक गावनिहाय टंचाईची सद्यःस्थिती व टंचाई भासल्यास त्यावर करावयाच्या उपाययोजना, विहिरी, विंधन विहिरी अधिग्रहण, नवीन विहिरी, विंधन विहिरी, विहिरी खोलीकरण, वीजजोडणी, टँकरने पाणीपुरवठा याबाबत सविस्तर आढावा घेतला.

आदिवासी सांस्कृतिक भवन बांधकाम व नवीन पुतळे उभारणीबाबत आढावा घेताना मंत्री डॉ. गावित. शेजारी सावनकुमार, विनायक महामुनी, धनंजय गोगटे, सुधीर खांदे, नीलेश तांबे, चंद्रकांत पवार, नितीन कापडणीस, नितीन गर्जे, अमोल बागूल, जयवंत उगले, राहुल मोरे आदी.

आदिवासी सांस्कृतिक भवन बांधकाम,नवीन पुतळे उभारणीबाबत आढावा

आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी गुरुवारी (ता. १८) जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात नंदुरबार येथे आदिवासी सांस्कृतिक भवन बांधकाम व नवीन पुतळे उभारणीबाबत आढावा बैठक घेतली.

या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार, उपविभागीय अधिकारी विनायक महामुनी, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार, शहरी विकास प्राधिकरण सहआयुक्त नितीन कापडणीस.

तहसीलदार नितीन गर्जे, पालिका मुख्याधिकारी अमोल बागूल, गटविकास अधिकारी जयवंत उगले, प्रभारी तहसीलदार राहुल मोरे, डॉ. कांतिलाल टाटिया आदी संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या वेळी आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित म्हणाले, की नंदुरबार येथे नवापूर चौफुली व धुळे चौफुली येथे नवीन दोन पुतळे उभारणी करावयाचे असून, पुतळे उभारणीसाठी लागणाऱ्या विविध विभागांच्या परवानग्या घेण्याबाबत तत्काळ कार्यवाही करावी. पुतळे उभारणीसाठी संबंधित अधिकाऱ्यांची आजच

बैठक घेऊन आलेल्या प्रस्तावावर कार्यवाही करावी. पुतळे उभारताना ते निकषात व नियमात बसतील असे उभारावेत, जेणेकरून भविष्यात अडचणी येणार नाहीत, अशा सूचनाही या वेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT