Nandurbar News : जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामसेवकाने गावनिहाय व घरनिहाय योजनांच्या अंमलबजावणीचा डेटा तयार करावा, तसेच येणाऱ्या दोन वर्षांत गावातील प्रत्येक घरात शासकीय योजनांची लाभ पोचविण्याचे नियोजन करण्याच्या सूचना राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिल्या आहेत. (Dr. Vijaykumar gavit statement of Plan to give benefit of government scheme to every family nandurbar news)
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ग्रामविकास विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी महिला व बालकल्याण सभापती संगीता गावित, कृषी व पशुसंवर्धन सभापती हेमलता शितोळे.
परिवीक्षाधीन सनदी अधिकारी तथा नवापूर तहसीलदार अंजली शर्मा, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी (नंदुरबार) चंद्रकांत पवार, गटविकास अधिकारी देवीदास देवरे (नवापूर) आर. डी. घोरपडे (शहादा) व ग्रामसेवक संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक उपस्थित होते.
मंत्री डॉ. गावित म्हणाले, की शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी होण्यासाठी त्यावर वेळेत कार्यवाही होणे अपेक्षित आहे. त्यासाठी कुठल्याही योजनेचा निधी वेळेत खर्च होण्याबरोबरच तो व्यपगत होणार नाही याची काळजी घेण्यात यावी.
जिल्ह्यात शबरी घरकुल योजनेसाठी कोणत्याही प्रकारचे उद्दिष्ट नसल्याने पात्र असणाऱ्या सर्व अर्जदारांना या योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही तत्काळ करण्यात यावी. एकही पात्र व्यक्ती घरकुलापासून वंचित राहणार नाही याची काळजी संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवकांनी घ्यावी.
सरकारने आखलेल्या सर्व योजना जिल्ह्यातील नागरिकांना दोन वर्षांत मिळतील यासाठीचे नियोजन करण्यात यावे. जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सर्व गटविकास अधिकाऱ्यांनी जलजीवन मिशनच्या कामांच्या प्रशासकीय मान्यता व कामांचे आदेश त्वरित देण्याची कार्यवाही करावी.
कामाचे आदेश वितरित होऊनही ज्या ठेकेदारांमार्फत काम सुरू झालेले नाही अशा ठेकेदारांना काळ्या यादीत का टाकू नये, याबाबत कारणे दाखवा नोटिसा देण्यात याव्यात. पिण्याचे पाणी ही अत्यावश्यक बाब असल्याने या कामात कुठलीही दिरंगाई हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही.
टंचाईच्या कामांबाबत बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, की संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय करून कामे मार्गी लावावीत. मार्चअखेरपर्यंत सर्व कामे होणे अपेक्षित आहे. सर्व गावांतील घरकुलांची कामे पूर्ण करण्यासोबतच जी गावे-पाडे यांना जोडणारे रस्ते नसतील अशा रस्त्यांची यादी तयार करून त्वरित सादर करावी.
२०२४-२५ पर्यंत सर्व गावे-पाडे १०० टक्के रस्त्यांनी जोडली गेली पाहिजेत व ते बारमाही झालेले पाहिजेत. ग्रामसेवकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील गावांतील अडचणी, त्रुटींबाबतची माहिती सादर करावी. ग्रामसेवकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील गावांतील प्रत्येक घराची संपूर्ण तपशीलवार माहिती संकलित ठेवावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.