Dhule: Shiv Sena office bearers and activists during inspection regarding drain cleaning esakal
उत्तर महाराष्ट्र

Drainage Cleaning News : धुळ्यातील नालेसफाई केवळ कागदावर

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : दर वर्षी कागदावर नालेसफाई दाखवून कोट्यवधी रुपयांची बिले काढली जातात.

या वर्षीही अद्याप शहरातील विविध भागांतून वाहणाऱ्या नाल्यांची १० टक्केदेखील साफसफाई महापालिकेकडून झालेली नाही, असा आरोप करत भाजप नगरसेवकांनी जनतेच्या आरोग्याशी चालविलेला खेळ थांबवावा, मनपा आयुक्तांनी केबिनमध्ये बसून कारभार न पाहता प्रत्यक्षात नालेसफाईवर लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी शिवसेना (उबाठा) पक्षाने केली.

नालेसफाईप्रश्‍नी थेट नाल्यात उतरून पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मनपाविरोधात घोषणाबाजी केली. (Drainage Cleaning on paper only Shouting slogans against Panchnama Municipal Corporation by going directly into drain Dhule News)

धुळे शहरातील मुख्य व दाट लोकवस्तीच्या भागातून मोतीनाला, मध्यवर्ती नाला, सुशीनाला, हमाल मापाडी, चिरंतन हॉस्पिटल ते चंदननगर, अग्रवालनगर आदी परिसरातून मुख्य नाले व या नाल्यांना जोडणारे सुमारे २२-२५ उपनाले आहेत.

या नाल्यांची अद्याप १० टक्केदेखील साफसफाई महापालिका आरोग्य विभागाकडून झालेली नाही. दर वर्षी नालेसफाईच्या नावाने कोट्यवधींची बिले काढली जातात. प्रत्यक्षात ही नालेसफाई केवळ कागदावरच असते. शहरातील प्रमुख रस्त्यांच्या कॉर्नर साइटवर नालेसफाई केली जाते. नाल्याच्या आत मात्र सफाई केली जात नाही.

मागील आठवड्यात आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी नालेसफाईचे काम ५० टक्के पूर्ण झाल्याचे आयुक्तांना ठासून सांगितले, आयुक्तांनीदेखील शहानिशा न करता नालेसफाई झाल्याचे जाहीर करून टाकल्याचे शिवसेना (उबाठा) पक्षाने म्हटले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ऑन द स्पॉट पंचनामा

नालेसफाईच्या अनुषंगाने शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गुरुवारी (ता. १८) विविध नाल्यांत जाऊन पाहणी केली. या पाहणीत नालेसफाईच्या नावाने बोंब असल्याचे आढळून आले. साचलेला गाळ, प्लॅस्टिक, काटेरी झाडे-झुडपांची सफाईच अद्याप करण्यात आलेली नाही.

नालेसफाईसाठी लागणारे जेसीबी टेंडर काढूनही अद्यापही उपलब्ध झालेले नसल्याचे शिवसेनेने (उबाठा) म्हटले आहे. नालेसफाईप्रश्‍नी थेट नाल्यात उतरून पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मनपाविरोधात घोषणाबाजी केली.

केवळ बिलांमध्ये धन्यता

नालेसफाईबाबत सत्ताधारी भाजप नगरसेवकच उदासीन असून, नालेसफाईचे कोणतेही सोयरसुतक त्यांना नाही. फक्त गटारी, रस्ते, यांचे वाढीव टेंडर बनवून बिले काढण्यात ते धन्यता मानत असून, धुळेकरांशी त्यांना देणेघेणे नाही.

फक्त विकासकामांचे बॅनर लावून धुळेकरांना मूर्ख बनविण्याचे काम सुरू असल्याची टीका शिवसेनेने केली.

पक्षाचे सहसंपर्कप्रमुख महेश मिस्तरी, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगरप्रमुख धीरज पाटील, डॉ. सुशील महाजन, भरत मोरे, देवीदास लोणारी, ललित माळी, गुलाब माळी, मच्छिंद्र निकम, सुनील पाटील, विनोद जगताप, संदीप सूर्यवंशी, संजय जवराज, प्रवीण साळवे, छोटू माळी, अण्णा फुलपगारे यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा आंदोलनात सहभाग होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT