Dhule Accident News : चारणपाडा (ता. शिरपूर) येथे मंगळवारी झालेल्या भीषण अपघातात बापलेकांचा मृत्यू झाला तर अपघाताच्या काही वेळ आधीच मुलगी तेथून निघून गेल्याने सुदैवाने बचावली.
अपघातस्थळी तातडीने मदत कार्य सुरू झाले, मात्र वाहने एकमेकात अडकल्याने ‘आम्हाला वाचवा हो, पाणी द्या,मदत करा’च्या किंकाळ्यांनी वातावरणात थरकाप उडाला होता. (driver loss control and truck goes into hotel dhule accident news)
पळासनेरजवळ कोळसापाणी पाडा येथील रहिवासी असलेल्या संजय जयमल पावरा यांची मुलगी धुळे येथे वस्तीगृहात राहते. शाळा सुरु झाल्यामुळे तिला धुळे येथे सोडण्यासाठी संजय पावरा व त्यांचा मुलगा रितेश चारणपाडा येथे गेले होते. तेथून एका खासगी वाहनात बसवून त्यांनी मुलीस रवाना केले.
त्यानंतर काही वेळ बापलेक हॉटेल सदगुरुवर रेंगाळले. तेवढ्यात आलेल्या ट्रकने मृत्यूचे तांडव करीत दोघांचा बळी घेतला. कोळसापाणी गावातील पाच जणांना एकाच अपघातात जीव गमवावा लागला. त्यात सर्वच मजूर वा मजुरांची मुले आहेत. आपल्या उमद्या स्वभावामुळे परिसरात लोकप्रिय असलेले वृद्ध हॉटेलचालक प्रतापसिंह गिरासेदेखील अपघातात ठार झाले. पळासनेर आणि कोळसापाणी पाडा परिसरावर या अपघातानंतर शोककळा पसरली.
मदतकर्त्यांचे काळीज हेलावले
अपघातानंतर मोठ्या प्रमाणात व तातडीने मदतकार्य सुरु झाले. मात्र अपघातग्रस्त वाहने एकात एक अडकून पडल्याने जखमी व मृतांना बाहेर काढणे लगेचच शक्य झाले नाही. वाहनांच्या दाटीमुळे मरणाच्या दारात असलेल्यांसह जखमींकडून आम्हाला बाहेर काढा, पाणी द्या अशी विनवणी केली जात होती.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
अर्धवट बेशुद्धीत असलेले गंभीर जखमी आपल्या कुटुंबीयांच्या नावाने हाका मारत होते. सर्वत्र रक्तमांसाचा चिखल झाला होता. ते दृश्य पाहून मदतीसाठी धावून गेलेल्यांचे काळीज हेलावले. घटनास्थळी मृतदेहांवर लिंबाचा पाला टाकून झाकत मदतकार्य सुरु राहिले. त्यामुळे अनेकांचा जीव वाचवणे शक्य झाले.
खंडेलवाल कुटुंबावर आपत्ती
धुळे येथील खंडेलवाल कुटुंब मध्यप्रदेशात गेले होते. तेथून सकाळी धुळे येथे परत जाण्यासाठी ते निघाले. सकाळी दहाला त्यांनी बिजासन घाट ओलांडला. अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रक त्यांच्या मागे होता.
सदगुरू हॉटेलजवळ आल्यानंतर मागाहून भरधाव आलेल्या ट्रकने खंडेलवाल यांची कार फरफटत नेली. या अपघातात सुनीता खंडेलवाल ठार झाल्या. त्यांचे पती राजेश व दोन मुले जखमी झाली. खंडेलवाल कुटुंब धुळे शहरातील जीटीपी स्टॉप येथे राहते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.