drought sakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Drought News : साक्री तालुक्यात विहिरींनी तळ गाठला; रब्बीची आशाही फोल

सकाळ वृत्तसेवा

Dhule Drought News : साक्री तालुक्यात यंदा जोरदार पावसाअभावी बहुतेक लघुप्रकल्प, पाझर तलाव कोरडेठाक आहेत. भीजपावसावर तग धरून असलेल्या खरीप हंगामाची काढणी केली जात असून, यंदा प्रथमच रब्बी पेरणी घटणार असल्याचे चित्र आहे. वर्षभर मुबलक पाणी असणाऱ्या विहिरींनी तळ गाठला आहे.

ऑक्टोबर हीटचे वाढलेले तापमान, त्यातून होणाऱ्या बाष्पीभवनामुळे ज्या ठिकाणी पाणी आहे, अशा ठिकाणचा जलसाठा घटतोय. पावसाळ्यात अपवाद वगळता एकदाही जोरदार पाऊस झाला नाही म्हणून विहिरींची पाणीपातळी वाढू शकली नाही. आतापासूनच विहिरी तळ गाठत असून, रब्बीची आशाही फोल ठरणार आहेत. (drought like condition in dhule news)

यंदा पावसाळ्याच्या कोणत्याही नक्षत्रात जोरदार पाऊस झाला नाही. तालुक्यातील अक्कलपाडा प्रकल्प आणि लाटीपाडा, मालनगाव, जामखेली मध्यम प्रकल्प वगळता अन्य कोणत्याही लघुप्रकल्प व पाझर तलावात पाणी नसल्याचे वास्तव आहे. मृग नक्षत्रातील तोकड्या पावसात शेतकऱ्यांनी खरीप पेरण्या गुंडाळल्या.

आज येईल उद्या येईल या अपेक्षेत कोणत्याही नक्षत्रात मुसळधार पाऊस झाला नाही. केवळ भीजपावसावर खरीप पिके तग धरून उभी होती. कोरडवाहू क्षेत्रातील तृणधान्यातील पिकांची उंचीही अपेक्षित वाढू शकली नाही.

बागायती क्षेत्रात उपलब्ध पाण्यावर कपाशी, तूर, मका यांसारखी पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी आटापिटा केला. गेल्या महिन्याभरापासून कापूस काढणी सुरू आहे. तृणधान्यातील बाजरी, मका पिकाची सध्या कापणी केली जात आहे. मुसळधार पावसाअभावी नदी-नाले, ओढे कोरडेठाक आहेत.

दुष्काळी मदतीची अपेक्षा

दुष्काळी परिस्थिती असतानाही शासन यंत्रणा दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे सांगत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, खासदारांनी शेतकऱ्यांना काहीतरी मदत मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. इतर ठिकाणचे आमदार शेतकऱ्यांना हमखास मदत मिळवून देत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. साक्रीच्या आमदार मात्र अशा बाबींकडे दुर्लक्ष करत असल्याची ओरड आहे.

गेल्या वर्षी धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली होती. साक्री तालुक्याला मात्र वेगळी वागणूक का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. धुळे जिल्ह्यात सर्वाधिक भयावह चित्र साक्री तालुक्याचे आहे. हे गांभीर्य लक्षात घेऊन आमदारांनी विधानसभेत पाठपुरावा करावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

सोशल मीडियावर दुष्काळासाठी मदत, पीकविमा संरक्षण दिले जात असल्याचे वृत्त फिरत आहे. अर्थात हे किती खरे, किती खोटे हे शेतकरी ओळखून आहेत. आधीच कर्जबाजारी, त्यावर निसर्गाच्या अवकृपा यामुळे बेजार झालेला शेतकरी हतबल झाला आहे.

दुष्काळावर मात करण्यासाठी प्रशासनातील अधिकारी, मंत्री बैठकाही घेतात. त्यात केवळ चर्चा केली जाते. कारवाई मात्र होत नसल्याचे चित्र आहे. रोजगार हमी योजना कामांची भ्रांत आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी, ग्रामस्थांमध्ये शासकीय यंत्रणेविषयी संताप व्यक्त केला जात आहे.

रब्बी पेरणी घटणार

हिवाळ्यात विहिरींच्या पाण्याची पातळी खालावत आहे. उन्हाळ्यात परिस्थिती बिकट असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पाण्यासाठी विहिरी कोरणे, बोअर लावणे आदी कामे शेतकरी करतीलही पण आडात नाही तिथे पोहरात कुठून येणार अशी अवस्था आहे. कारण संपूर्ण पावसाळ्यात एकदाही मुसळधार पाऊस झाला नाही.

गेल्या तीन वर्षांपासून निसर्गाची मेहरनजर होती. बागायतीमुळे शेते हिरवीगार दिसत होती. यंदा नवीन पावसाळा सुरू होईपर्यंत हिरवळीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. बेभरवशाच्या शेती उत्पादनामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून, उन्हाळ्यात मजुरांना काम शोधण्याची वेळ येऊ शकते. पाण्याअभावी बागायती असणारी शेती अडचणीत आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

"Fake Narrative फार काळ टिकत नाही"; पंतप्रधान मोदींनी केलं विक्रांत मेस्सीच्या द साबरमती रिपोर्टचं कौतुक

Latest Maharashtra News Updates live : महाराष्ट्रात चोरांचे सरकार,मल्लिकार्जुन खर्गेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT