Stunted crop growth due to lack of sunlight.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Agriculture News : सूर्यप्रकाशाअभावी पिके कोमात, तर तण जोमात; शेतकऱ्यांकडून मजुरांची शोधाशोध

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Agriculture News : तळोदा तालुक्यातील रांझणी, चिनोदा, प्रतापपूर, रोझवा पुनर्वसनसह परिसरात सततच्या पावसाने सूर्यप्रकाशाअभावी पिकांची वाढ खुंटली असून, काही पिकांची मुळे कुजत असल्याचे चित्र आहे.

पुरेसा वाफसा नसल्याने कोळपणी रखडली असल्याचे चित्र आहे, तर निंदणी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मात्र मजूरटंचाई भासत असून, शेतमालकांकडून मजुरांची शोधाशोध करण्यात येत आहे. (Due to continuous rains germination capacity of crops has decreased Nandurbar Agriculture News )

यंदा तळोदा तालुक्यात जून महिन्यात पावसाने जेमतेम हजेरी लावली. मात्र जुलै महिन्याच्या सुरवातीपासून तालुक्यात पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली आहे. दरम्यान, यंदा उशिरा पाऊस झाल्याने तालुक्यात खरिपाच्या पेरणीस उशिरा सुरवात झाली; परंतु त्यानंतर सातत्याने होणाऱ्या पावसामुळे पिकांची उगवणक्षमता कमी झाली असून, पिके विरळ असल्याचे चित्र आहे.

त्यातच सूर्यप्रकाशाअभावी पिकांची वाढ खुंटली असून, तण मात्र जोमात आहे. सतत पाऊस होत असल्याने पिकांपेक्षा तणांचीच वाढ अधिक होत असल्याचे चित्र आहे. मात्र त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांचे नियोजन करण्यास अडचणी येत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तण नष्ट करण्यासाठी शेतकऱ्यांकडून आंतरमशागतीलाही वेळ मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणात तणनाशक औषध फवारणीसाठी शेतकरी सरसावले असून, फवारणीसाठी पंप तसेच फवारणी करणाऱ्या मजुरांचीही शोधाशोध शेतकऱ्यांना करावी लागत आहे.

तळोदा परिसरात सततच्या पावसाच्या रिपरिप तसेच मोठ्या प्रमाणावर वाढत असलेल्या तणांमुळे खरीप हंगाम संकटात सापडला असून, कोळपणी, निंदणी, खते देणे कधी एकदाचे पूर्ण होते यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. उशिरा पेरणी झाल्याने तसेच मशागतीही होत नसल्याने खरीप हंगाम काहीसा धोक्यात आला असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT