धडगाव : येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात मागील काही महिन्यांपासून औषधांचा साठा संपला आहे. त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. सध्या ऋतू बदलामुळे शहरासह ग्रामीण भागात साथरोगांचे रुग्ण वाढत आहेत.
ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्ण, दारिद्र्यरेषेखालील नागरिकांची उपचार घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात व तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात गर्दी असते. बाह्य रुग्ण विभागात तपासून येथील डॉक्टर रुग्णांना औषधे देतात, मात्र रुग्णालयातील औषधांचा साठा संपला असल्याने गरीब रुग्णांना स्वत: औषधे खरेदी करावी लागत आहेत. (Due to lack of medicines in Dhadgaon hospital inconvenience to patients Nandurbar News)
औषध विभागात सध्या मोजक्याच औषधांचा साठा आहे. औषधी घेण्यासाठी जाणाऱ्या रुग्णांना केवळ एखादे औषध देऊन परत पाठविले जाते. यातील उर्वरित औषधे बाहेरून खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो. दरम्यान काही रुग्णाना तर औषधंच उपलब्ध होत नाही.
डॉक्टरांनी लिहून दिलेले औषधी खासगी मेडिकलमध्ये उपलब्ध नसतात. यातून येथील गरीब व असहाय रुग्णांची फरफट होते. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, वरिष्ठ पातळीवर औषध पुरवठा करण्याची मागणी केली आहे. परंतु औषधी उपलब्ध झाले नाही. पुरेशा प्रमाणात औषधी नसल्याने रुग्णांना खासगी औषधालयातून महागडी औषधी विकत घ्यावी लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....
"काही महिन्यांपासून ग्रामीण रुग्णालयातील सेवा ढासळली आहे. रुग्णालयात सुश्रुषादेखील व्यवस्थित होत नाही. उपचारार्थी रुग्णांना औषधी मिळत नाही. रुग्णाची विचारपूस व त्यांच्याशी समस्यांची उत्तरे देण्यासाठी कर्मचारी नाहीत. येथील आरोग्य यंत्रणा वाऱ्यावर असल्याचे स्पष्ट होते. सेवेत सुधारणा करून दुर्गम भागातील रुग्णांना न्याय देण्याची आवश्यकता आहे."
दिलवरसिंग पावरा. शिवसेना शहरप्रमुख, रोशमाळ.धडगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.