Superintendent of Police Sanjay Barkund while appealing for peace esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : मागील कुरापतीमुळे घरांवर दगडफेक; पिंपळनेरला चोख बंदोबस्त

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : येथील सुभाष चौकात मागील काही कारणांच्या कुरापतीमुळे घरांवर दगडफेक झाल्याची घटना गुरूवारी (ता. १) रात्री अकराच्या सुमारास घडली.

या प्रकरणी पोलिसांनी सहा संशयितांना ताब्यात घेतले असून, चौक बंदोबस्त ठेवत शांतता समितीच्या बैठकीत शांततेचे आवाहन केले.

या प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण गवळी यांच्या फिर्यादीवरून संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (Due to previous complaints Stone pelting house Pimpalner well settled situation under control after appeal dhule news)

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, एसडीपीओ संभाजी पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी शुक्रवारी (ता. २) पिंपळनेर येथे भेट देऊन परिस्थिती जाणून घेत शांतता राखण्याचे आवाहन केले.

पिंपळनेर शहरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा पोस्ट व्हाट्सअप ग्रुपमध्ये व्हायरल होत आहेत. यातच काही दिवसांपूर्वी शहरातील एका भागाला नाव देत टिपू सुलतान यांचे चित्र असणारा फलक लावण्यात आल्याने वादाला सुरवात झाली होती.

पोलिसांनी दोन्ही समाजातील नागरिकांशी चर्चा करून हा वाद तात्पुरता शमावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अद्याप शमला नसल्याचे गुरूवारच्या घटनेतून दिसून येत आहे. गुरूवारी काहींनी एकत्र येऊन दंगल घडवण्याच्या उद्देशाने सुभाष चौक भागातील लोकांना दमदाटी करून शिवीगाळ करत आजूबाजूस पडलेल्या विटा फेकून गल्लीतील घरांचे व बाजारपेठेतील दुकानांचे नुकसान केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या ठिकाणी उभ्या असलेल्या रिक्षाच्या काचाही फोडल्या. याबाबत माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले व संपूर्ण घटना शिताफीने हाताळत या ठिकाणी कडक बंदोबस्त लावण्यात आला. त्यामुळे शहराती सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहेत.

या प्रकरणी पियुष उर्फ सौरभ कोठावदे, पंकज वानखेडे, मयूर अहिरे, प्रथम नगरकर, चेतन पगारे, सनी शूटर उर्फ चेतन ठाकूर, सुजित पाटील व इतर (रा. पिंपळनेर, ता. साक्री) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे. तर, नगरकर व पगारे हे दोघे अद्याप फरारी आहेत.

"देशातील, राज्यातील किंवा जिल्ह्यातील किरकोळ घटनांवरून तणावाची परिस्थिती निर्माण होत आहे. सोशल मीडियातून देखील प्रक्षोभक, सामाजिक तेढ निर्माण होईल, समाज स्वास्थ्य खराब होईल असे संदेश पाठवू नका. व्हायरल होणारे मेसेज आधी पारखून घ्या."

-संजय बारकुंड, पोलीस अधीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT