Dhule Municipal Corporation esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News: धुळेकरांसाठी E Bus; मनपासाठी ‘पेट्रोलपंप’चे स्वप्न! महासभेपुढे विषय

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : महापालिकेच्या येत्या महासभेपुढे नेहमीप्रमाणे बरेच विषय नामकरणाचे आहेत. या विषयांबरोबरच काही महत्त्वाचे विषयही या वेळी घेण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने मनपामार्फत शहरात पेट्रोलपंप उभारणी तसेच धुळे महापालिका हद्दीत ई-बस सेवा सुरू करण्याचा विषय आहे.

यातील एक पेट्रोलपंपाचा विषय महापालिकेच्या उत्पन्नासाठी तर ई-बसचा विषय संपूर्ण धुळेकरांना लाभ देण्यासाठी महत्त्वाचा आहे. महापालिकेचा पूर्वानुभव पाहता कागदावर असे विषय येतात नंतर मात्र ते गायब होतात.

त्यामुळे विश्‍वास ठेवणे थोडे कठीण जाते. महापालिकेतील सत्ताधारी व प्रशासनाने या दोन्ही विषयांवर गांभीर्याने काम केले, प्रत्यक्षात उतरवले तर धुळे शहरात महापालिकेने काहीतरी वेगळे केले याचा धुळेकरांना निश्‍चितच आनंद होईल. (E Bus for Dhule poeple dream of petrol pump for municipality Subject before General Assembly Dhule News)

धुळे महापालिकेच्या माध्यमातून तसेच केंद्र, राज्य शासनाच्या माध्यमातून मूलभूत सोयी-सुविधांसह इतर विविध कामे होतात. गेल्या काही वर्षांत मूलभूत सोयी-सुविधांची हजारो कामे झाली तरी कामांच्या दर्जामुळे मूलभूत सोयी-सुविधांची वानवा पाहायला मिळते.

शहराचा विस्तार होत गेला, हद्दवाढ झाल्यानंतर धुळे शहर क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे झाले. पण सोयी-सुविधा आणि एकूणच विकासाच्या अंगाने तेवढेच लहान झाले हेही नाकारता येणार नाही.

अगदी ग्रामपंचायत बरी असे म्हणायलादेखील नागरिक मागेपुढे पाहत नाहीत अशी स्थिती दिसते. काही अपवादात्मक कामे वगळता शहर विकासाच्या दृष्टीने, शहराच्या भविष्याच्या दृष्टीने काही पायाभरणीदेखील होताना दिसत नाही.

त्यामुळे केवळ रस्ते, गटारी यापलीकडे काही होणार की नाही, असाही प्रश्‍न अनेक जण विचारतात. दरम्यान, सरत्या पंचवार्षिक कार्यकाळात महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी एक-दोन विषयांना हात घातल्याचे दिसते. येत्या १३ सप्टेंबरला होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हे विषय घेण्यात आले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अजेंड्यावर विषय

महापालिकेच्या कोट्यवधी रुपयांच्या प्रॉपर्टी असताना त्यांचा काहीही उपयोग केला जात नाही ही वस्तुस्थिती आहे. ज्या प्रॉपर्टी उभ्या आहेत, त्यातूनही फारसे उत्पन्न मिळत नाही असे दिसते. त्यामुळे केवळ मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुली हाच महापालिकेचा प्रमुख उत्पन्नस्रोत आहे.

महापालिकेचे स्वतःचे उत्पन्न वाढविण्यासाठी सत्ताधारी, प्रशासनाने गांभीर्याने प्रयत्न केल्याचे गेल्या अनेक वर्षांत पाहायला मिळालेले नाही. १३ सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेपुढे मात्र महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी धुळे शहरात मनपामार्फत पेट्रोल उभारण्याचा विषय आला आहे.

याशिवाय धुळे महापालिका हद्दीत ई-बससेवा उपक्रम राबविण्यासाठी तांत्रिक प्रकल्प सल्लागार नियुक्त करून प्रकल्प आराखडा सादर करण्याचाही विषय घेण्यात आला आहे. हे दोन्ही विषय एकादृष्टीने वेगळे आहेत.

पेट्रोलपंप उभारणीतून महापालिकेच्या उत्पन्नाचा एक स्रोत निर्माण होऊ शकेल. दुसरीकडे ई-बस सेवेचा नागरिकांना लाभ होऊ शकेल. दरम्यान, यापूर्वीदेखील महापालिकेने शहरात मनपाच्या माध्यमातून सिटी बस सेवा सुरू करण्याचा विषय घेतला होता.

त्याचे नंतर काय झाले माहीत नाही. त्यामुळे हे दोन्ही विषय प्रत्यक्षात येतील तोच दिवस खरा. अर्थात त्यादृष्टीने पाऊल पडते आहे हेही नसे थोडके.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: ...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

IND vs AUS : स्टंपकडे जाणारा चेंडू लाबुशेनने रोखला, सिराज चांगलाच चिडला; कोहलीने तर बेल्सच उडवल्या..काय हा प्रकार

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

IND vs AUS: पर्थ कसोटीत ऋषभ पंतसोबत IPL ऑक्शनची चर्चा; हाय व्होल्टेज सामन्यातील दोन्ही संघातील खेळाडूंच्या संवादाचा Video Viral

Ram Naik : अलीकडच्या राजकारणात एकमेकांना नाव ठेवण्याची स्पर्धा : राम नाईक यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT