Dhule Municipal Corporation esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : साडेआठशे हरकतदारांची सुनावणीला दांडी; 19 जूनपासून पुन्हा सुनावणी

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शहराच्या देवपूर भागातील ज्या मालमत्ताधारकांना करयोग्यमूल्य निश्‍चितीबाबतच्या नोटिसा प्राप्त झाल्या नसतील त्यांनी महापालिकेशी संपर्क साधून नोटीस प्राप्त करून घ्यावी, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

दरम्यान, हरकतींवर सुनावणीची प्रक्रिया १९ जूनपासून पुन्हा सुरू होणार आहे. दरम्यान, आतापर्यंत तीन ते साडेतीन हजार हरकतींवर सुनावणी झाली आहे. साडेआठशे हरकतदारांनी मात्र सुनावणीलाच दांडी मारली.

धुळे महापालिका हद्दीतील देवपूर विभागातील मालमत्तांना नंबरिंग होऊन सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले. त्यानंतर संबंधित मालमत्तांना करयोग्य मूल्य निश्‍चितीच्या नोटिसा महापालिकेकडून वितरित करण्यात आल्या. (Eight and half hundred objectors scheduled for hearing Revised taxation procedures Rehearing from June 19 Contact appeal for notices Dhule News)

देवपूर भागात २४ हजारांवर मालमत्ताधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या. या नोटिसांवर ११ मे ते १२ जूनदरम्यान हरकती मागविण्यात आल्या. या कालावधीत एकूण पाच हजार ४२५ हरकती दाखल झाल्या.

या हरकतींवर २९ मेपासून महापालिकेत सुनावणी सुरू झाली. सध्या सुनावणीचे काम बंद होते. मात्र १९ जूनपासून सुनावणीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

५०२ स्थळपाहणी

हरकतींच्या सुनावणीदरम्यान ज्यांच्या हरकतींमध्ये तथ्य आढळून येते अशा हरकतदारांच्या मालमत्तांच्या ठिकाणी स्थळपाहणीचा निर्णय घेण्यात येतो. आतापर्यंत झालेल्या सुनावणीतून अशा ५०२ हरकतदारांच्या मालमत्तांच्या ठिकाणी स्थळपाहणीचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दरम्यान, ज्यांना सुनावणीसाठी बोलावण्यात आले, त्यातील तब्बल ८५४ हरकतदार सुनावणीसाठी मात्र गैरहजर राहिले आहेत. मालमत्ता कर आकारणीबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत. त्यामुळे विरोधी राजकीय पक्षांकडून नागरिकांना हरकती नोंदविण्याचे आवाहन केले आहे.

त्यानुसार अनेक जणांनी हरकती नोंदविल्या, मात्र नोटिसांच्या प्रमाणात हरकतींची संख्या तुलनेने खूपच कमी आहे. शिवाय हरकती घेऊन सुनावणीलाच गैरहजर राहणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे केवळ तक्रारींचा सूर आळवून काही उपयोग होणार नाही, असाही एक सूर आहे.

नोटीस प्राप्त करून घ्या

ज्या मालमत्ताधारकांना (घर बंद असल्यास किंवा अनवधानाने) कर आकारणीची नोटीस प्राप्त झाली नसेल अशा मालमत्ताधारकांनी धुळे महापालिका मालमत्ता कर विभाग क्रमांक १०७ येथे संपर्क करावा. तसेच आपल्या मालमत्तेवर बाहेरील भागात लाल अक्षराने नमूद केलेला मालमत्ता क्रमांक सोबत आणावा व कर आकारणीची नोटीस प्राप्त करून घ्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Rathod won in Digras Assembly Election Results 2024: माणिकराव ठाकरेंचा पुन्हा पराभूत, हायव्होल्टेज लढतीत संजय राठोड विजयी

Eknath Shinde : एकनाथ शिंदे महाविकास आघाडीपेक्षा भारी, केलीय आता पुढची तयारी

"त्याने माझ्या तब्येतीची चौकशी केली आणि..." शुटिंगमुळे थकलेल्या सलमानच्या कृतीने भारावली हिना , म्हणाली...

Prakash Solanke won Majalgaon Assembly election 2024 final Result: माजलगावमध्ये अटीतटीच्या लढतीत प्रकाश सोळंके विजयी, शरद पवार गटाच्या उमेदवाराचा पराभव

Ballarpur Assembly Constituency Result 2024 : बल्लारपूरमध्ये भाजपचा गुलाल! सुधीर मुनगंटीवारांनी 105969 मतांनी गड राखला

SCROLL FOR NEXT