Dog Bite News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : पिसाळलेल्या कुत्र्याने 8 -10 बालकांना घेतला चावा; लहान मुलांवर ‘संक्रांत’

सकाळ वृत्तसेवा

धुळे : मोहाडी उपनगर येथे रविवारी (ता. १५) पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः उच्छाद मांडल्याचे समोर आले. या कुत्र्याने रविवारी सायंकाळी पाच ते सहादरम्यान मोहाडी येथील तब्बल आठ ते दहा लहान मुलांना चावा घेत जखमी केले. या सर्व बालकांना उपचारासाठी श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, यातील एका मुलाला गंभीर दुखापत झाल्याचे समजते.

शहरात अनेक वर्षांपासून मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. या समस्येवर मनपातील सत्ताधारी, विरोधकांसह नागरिकांनी घसा कोरडा करूनही महापालिकेकडून उपाययोजना झाल्या नाहीत. कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचे कामही अद्याप प्रत्यक्ष सुरू झालेले नाही. महापालिकेच्या या गलथान कारभारामुळे अखेर रविवारी (ता. १५) संक्रांतीच्या दिवशी मोहाडी उपनगर येथील लहान मुलांवरच संक्रांत आल्याचे पाहायला मिळाले. (Eight To Ten children were bitten by a vicious dog Dhule News)

गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

मोहाडी येथील जयशंकर कॉलनी, वर्षावाडी, पिंपळादेवीनगर, वरचे गाव, खालचे गाव, संजयभाऊनगर, वालचंदनगर आदी भागातील तीन ते १२ वर्षे वयोगटातील बालकांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेत जखमी केले. पिसाळलेल्या कुत्र्यामागे काही नागरिक लागल्याने संबंधित कुत्रा पळत सुटला व वाटेत जी मुले सापडली त्यांना तो चावत सुटल्याची माहिती मिळाली.

यात आठ ते दहा बालकांना कुत्र्याने चावा घेत जखमी केले. कुणाला पायावर, कुणाला हातावर अशा पद्धतीने शरीराच्या विविध भागांवर कुत्र्याने मुलांना चावा घेतला. यात तेजस शरद बोरसे (वय ११), भावेश भटू ठाकूर (३), मनरूप फौर (३), सात्त्विक रवींद्र गावडे (वय १०), प्रथमेश दिगंबर पारधी (१२), अमन खाटीक (३), उत्कर्ष वाघ (९), शाहू कसबे (५) या मुलांचा यात समावेश आहे. या सर्व मुलांना तातडीने हिरे रुग्णालयात दाखल करण्यात आले.

यातील काही बालकांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. एका मुलाला गंभीर जखम झाल्याचे समजते. प्रभागातील नगरसेवक तथा मनपातील सभागृहनेते राजेश पवार यांनीही दवाखान्यात भेट देत जखमी मुलांची विचारपूस केली. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करूनही महापालिकेने कुठलीही कारवाई केली नाही. महापालिकेने वेळेवर याबाबत उपाययोजना केल्या असत्या तर आज ही वेळ आली नसती, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पवार यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे चंद्रकांत पाटील 5,700 मतांनी आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT