Gram Sevak Neighbor Villager giving information about scam of fake tax receipts in Gram Panchayat Office in Special Gram Sabha.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime: लामकानीत बनावट कर पावत्या बनवित अपहार; गुन्हा दाखल होणार

ग्रामपंचायतीत बनावट पावत्या देत कर वसुली करीत पैशांचा मोठा अपहार करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime : ग्रामपंचायतीत बनावट पावत्या देत कर वसुली करीत पैशांचा मोठा अपहार करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. ग्रामविकास अधिकारी यांनी विशेष ग्रामसभा बोलवीत या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. लामकानी ग्रामपंचायतीचे नूतन ग्रामविकास अधिकारी बी.डी.जगताप यांनी पदभार स्वीकारल्यानंतर हा घोटाळा उघड केला आहे.

याप्रकरणी गटविकास अधिकारी यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळताच या घोटाळ्याशी संबंधित असलेले तत्कालीन पदाधिकारी आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. (Embezzlement by making fake tax invoice in Lamkani dhule crime news)

लामकानी येथील ग्रामस्थ हे काही दाखल्यांसाठी ग्रामपंचायतीमध्ये गेले असता ग्रामविकास अधिकारी बी.डी.जगताप यांनी संबंधित नागरिक यांना दाखल देण्यापूर्वी त्यांच्याकडील थकबाकी तपासली असता अनेकांकडे घर आणि पाणीपट्टी थकबाकी असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी दाखल्यांसाठी अर्ज केलेल्या सर्वांना प्रथम थकबाकी भरण्याचे सांगितले.

यावर आम्ही सर्व थकबाकी भरली असून आमची दाखल्यासाठी अडवणूक न करण्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यावर श्री. जगताप यांनी त्यांना कर भरल्याची पावती मागितली. यावेळी चारशेहून अधिक ग्रामस्थांनी कर भरल्याची पावती श्री. जगताप यांनी दाखविली. यावेळी अनेक पावत्या श्री. जगताप यांच्याकडे आल्या.

या पावत्यांची तपासणी केली असता सर्व पावत्या या बनावट असल्याचे श्री. जगताप यांनी ग्रामस्थांना सांगितले. तर यावेळी त्यांनी ग्रामपंचायतीचे दप्तर तपासले असता त्यांना अनेक पावती पुस्तक गहाळ असल्याचे आढळून आले. अनेक ग्रामस्थांची बनावट पावत्या देत फसवणूक करण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले.

यावेळी श्री. जगताप यांनी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून गुरुवारी (ता.२८) विशेष ग्रामसभेचे आयोजन करत बनावट कर पावत्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैशांचा अपहार झाल्याचे त्यांनी ग्रामस्थांना सांगितले. त्यानंतर संबंधित दोषींवर कारवाईसाठी लेखी ठरावाचे पत्र गटविकास अधिकारी यांना दिले. गटविकास अधिकाऱ्यांनी ना हरकत प्रमाणपत्र दिल्यास संबंधित घोटाळेबाज तत्कालीन पदाधिकारी व कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचे जाहीर केले.

सभेत सरपंच सुशीला भिल, उपसरपंच बाजीराव महाले, पंचायत समिती सदस्य तुषार महाले, ग्रामपंचायत सदस्य वसंत मोरे, पुंडलिक येवले, अशोक तेले, आबा पाटील, नरहर येवले, नान्हकू भिल, प्रशांत पाकळे, सुदाम माळी, ग्रामविस्तार ग्रामस्थ व तरुण उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT