Employment meeting in Dhule on 7 December dhule news esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Job Fair : 7 डिसेंबरला धुळ्यात रोजगार मेळावा; कंपन्यांमधील 640 जागांच्या भरतीसाठी मुलाखती

सकाळ वृत्तसेवा

Dhule Job Fair : जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध खासगी कंपन्या, कारखाने, उद्योग-व्यवसाय व आस्थापना यांच्याकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने थेट नियुक्तीसाठी ७ डिसेंबरला धुळ्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त राजू वाकुडे यांनी दिली. ( Employment meeting in Dhule on 7 December dhule news )

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, धुळे आणि मॉडेल करिअर सेंटर (एनसीएस) यांच्यामार्फत प्रशासकीय संकुल (जुने जिल्हाधिकारी कार्यालय, आवार, धुळे) येथे ७ डिसेंबरला सकाळी दहा ते दुपारी दोनदरम्यान रोजगार मेळावा होईल.

यासाठी डिसान टेक्सटाईल पार्क (शिरपूर), रिलायन्स निप्पॉन लाइफ इन्शुरन्स कंपनी (धुळे), भारतीय जीवन विमा निगम (धुळे) या कंपनीतील विविध ६४० रिक्त पदे प्राप्त झाली आहेत. याकरिता नोकरी इच्छुक पात्रताधारक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येऊन जागेवरच निवड करण्यात येणार आहे.

नोंदणी करा, माहिती घ्या

धुळे जिल्ह्यातील नोकरी इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in तसेच www.ncs.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी. यापूर्वी नोंदणी केली नसल्यास प्रथम आपली नोंदणी करावी आणि होम पेजवरील नोकरी साधक (जॉब सिकर) लॉगिनमधून आपल्या यूझर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगिन करावे.

त्यानंतर डॅशबोर्डमधील पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या बटणावर क्लिक करून धुळे जिल्हा निवडून त्यातील प्लेसमेंट ड्रॉइव्ह-१२ पर्याय (२०२३-२०२४) धुळे यांची निवड करावी. उद्योजक, नियोक्तानिहाय त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती घ्यावी.

माहितीसाठी संपर्क साधा

अधिक माहितीसाठी www.rojgar.mahaswayam.gov.in संकेतस्थळासंबंधी संदीप बोरसे (मो. ९८२२२९९८४४), तसेच www.ncs.gov.in संकेतस्थळासंबंधी मुकेश बोरसे (मो. ८६००३०३४८७) यांच्याशी संपर्क साधावा.

याप्रमाणे आवश्यक किमान पात्रता धारण करीत असल्याची खात्री करून उपलब्ध असलेल्या रिक्त पदासाठी ऑनलाइन पद्धतीने आपला पसंती क्रमांक नोंदवावा आणि किमान दोन प्रतीत बायोडाटासह फोटो आणि आधारकार्ड, सेवायोजन नोंदणी कार्ड, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, इत्यादी कागदपत्रे कंपन्यांना देण्यासाठी छायाप्रती संच सोबत ठेवून प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. वाकुडे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री हेल्पलाइन

संकेतस्थळावर नोंदणी, नोंदणीचे अद्ययावतीकरण, रिक्त पदे अधिसूचित करणे, रिक्त पदास अनुसरून ॲप्लाय करणे, करिअरविषयक संधीची माहिती, रोजगार मेळावे, रोजगार प्रोत्साहनपर कार्यक्रमात इच्छुकता दर्शविणे, विविध प्रशिक्षण संस्था, स्टार्टअप आदी विविध ऑनलाइन सेवा-सुविधा उपलब्ध केल्या आहेत.

या सेवा घेताना लाभार्थी घटकांना येणाऱ्या अडचणी, तक्रारींचे निराकरण करण्यासाठी मुख्यमंत्री हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाइनचा टोल फ्री क्रमांक १८००१२०८०४० असा आहे. सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत ही सेवा उपलब्ध आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरण वाढली; सेन्सेक्स 500 अंकांनी घसरला, बँक निफ्टी 1000 अंकांनी कोसळला

IND vs NZ 2nd Test : Washington Sunder चा आणखी एक पराक्रम; मागील १६ वर्षांत अश्विन वगळता कोणालाच जमला नव्हता असा विक्रम

Mudra Loan: मोदी सरकारने दिवाळीत उद्योजकांना दिली मोठी भेट; आता मिळणार 20 लाखांच कर्ज

MVA Seat Sharing Formula : मविआचा जागा वाटपाचा फॉर्म्युला तिसऱ्यांदा बदलणार! थोरात म्हणाले, अजून बेरीज...

Hardik Pandya मुंबई इंडियन्सची साथ सोडणार? आयपीएल रिटेंशनआधी दिले मोठे संकेत

SCROLL FOR NEXT