JCB removing the encroachment in front of the commercial complex of Shetthi Sangh. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : शेतकी संघाच्या कार्यालयासमोरील अतिक्रमण काढले; कारवाईचे नागरिक, वाहनचालकांकडून स्वागत

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : येथील शेतकी सहकारी संघाच्या मुख्य कार्यालयासमोरील अतिक्रमण शुक्रवारी (ता. १७) सकाळी जेसीबी मशिनने काढण्यात आले. अनेक वर्षांपासून असलेली अतिक्रमण हटविल्यामुळे परिसरानेही मोकळा श्वास घेतला.

या कारवाईचे नागरिक, वाहनचालकांनी स्वागत केले.(encroachment in front of shetki office was removed dhule news)

साक्री तालुका शेतकरी सहकारी संघाच्या मुख्य कार्यालयाच्या आवारातील व्यापारी संकुलासमोर मांसविक्रीची दुकाने अनेक वर्षांपासून थाटण्यात आली होती. न्यायालयीन प्रक्रियेतून ही दुकाने अनेक वर्षांपासून त्याच जागी थाटलेली होती. या दुकानांमुळे बाजारपेठेतील मुख्य रस्ता अरुंद होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. तसेच शेतकी संघात येणाऱ्यांसाठीही ही दुकाने अडथळा ठरत होती.

शेतकी संघाने वेळोवेळी नोटीस देऊन ही दुकाने काढली जात नव्हती. यामुळे शुक्रवारी शेतकी संघाचे प्रेसिडेंट शिरीष सोनवणे, व्हाईस प्रेसिडेंट प्रदीपकुमार नांद्रे, संचालक दिनेश सोनवणे, राहुल अहिरराव, व्यवस्थापक दीपक साळुंके आदींनी सकाळी सातलाच जेसीबीन हे अतिक्रमण जमीनदोस्त करण्यास सुरुवात केली.

या वेळी शेतकरी संघाचे पदाधिकारी व अतिक्रमणधारकांत शाब्दिक चकमक झाली. परंतु पदाधिकाऱ्यांनी त्यांना कुठलीही दाद न देता अतिक्रमण जमीनदोस्त केले. दुपारी बारापर्यंत ही कारवाई सुरू होती. अतिक्रमण काढत असताना नागरिकांचीही गर्दी झाली होती.

दरम्यान, शेतकी संघाच्या व्यापारी गाळेधारकांची या अतिक्रमणामुळे गळचेपी होत होती. त्यांच्या व्यवसायावर परिणाम होत होता. तसेच शेतकी संघाच्या मुख्य कार्यालयात येणाऱ्या शेतकऱ्यांनाही अडचणीचे होत होते. या पुढील काळातही जर कुणीही शेतकी संघाच्या जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करू, असे प्रेसिडेंट शिरीष सोनवणे, व्हाइस प्रेसिडेंट प्रदीपकुमार नांद्रे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kamala Harris vs Donald Trump election : डोनाल्ड ट्र्म्प आघाडीवर... पण कमला हरिस यांचा कमबॅक शक्य; अंतिम निकाल कधी लागणार?

Andhari Vidhansabha: ऋतुजा लटके पुन्हा मारणार बाजी की मुरजी पटेल देणार धोबीपछाड? अंधेरी पूर्वेत दोन्ही शिवसेनांमध्ये चुरशीची लढत

Explained: डोनाल्ड ट्रम्प जिंकले तर शेअर बाजार कोसळणार; कमला हॅरिस अध्यक्ष झाल्यास काय होईल?

भाजपची 'ती' ऑफर स्वीकारली असती, तर जयंतराव आणि मी लालदिव्यातून फिरलो असतो; सुप्रिया सुळेंचा मोठा गौप्यस्फोट

हे काय वागणं आहे... Bigg Boss 18 मधील 'या' स्पर्धकावर भडकली रुपाली भोसले; सिद्धार्थ शुक्लासोबत तुलना करत म्हणाली-

SCROLL FOR NEXT