धुळे : महापालिकेने शहरात पुन्हा अतिक्रमण निर्मूलनाची (Encroachment Removal) मोहीम हाती घेतली आहे.
बुधवारी (ता. १५) दुपारी शहरातील तिरंगा चौकाकडून नंदी रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील चार ते पाच रहिवासी घरांचे अतिक्रमण काढण्यात आले. (encroachment removal by municipality action on 5 residential houses dhule news)
दरम्यान, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अजमेरा रोड खडीपट्टी भागात बडेमियाँ हाकेमियाँ हॉल ते पूर्व हुडको नाल्यालगत रस्त्यावर केलेले अतिक्रमणही काढण्यात येणार असल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले. या ठिकाणी १००-१२५ अतिक्रमणे असल्याचे सांगण्यात आले. संबंधित अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात येत आहेत.
तिरंगा चौक ते नंदी रोडदरम्यानच्या रस्त्यावरील अतिक्रमण आयुक्त देवीदास टेकाळे, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त डॉ. संगीता नांदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आले.
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या आवाहनास अतिक्रमणधारकांनी प्रतिसाद देत अतिक्रमणे स्वतःहून काढून घेतली. त्यामुळे पोलिस बंदोबस्ताची गरजही भासली नाही. अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुख प्रसाद जाधव, लिपिक संतोष घटी, मोहन गवळी, जाकिर बेग यांच्या पथकाने ही कारवाई केली.
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?
२४ तासांच्या आत अतिक्रमण हटवा
शहरातील बडेमियाँ हकिमियाँ हॉल ते पूर्व हुडको नाल्यालगत रस्त्यावर केलेले संपूर्ण अतिक्रमण उच्च न्यायालयाच्या ३ मार्च २०२२ च्या आदेशानुसार काढण्यात येणार असल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले.
संबंधित अतिक्रमणधारकांनी २४ तासांच्या आत अतिक्रमणे काढून घ्यावीत अन्यथा मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून पोलिस बंदोबस्तात जेसीबीद्वारे अतिक्रमणे काढण्यात येतील. त्यामुळे होणाऱ्या नुकसानीस अतिक्रमणधारक वैयक्तिक जबाबदार राहतील. तसेच कारवाईचा खर्च संबंधित अतिक्रमणधारकांकडून वसूल करण्यात येईल, त्यामुळे प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्तांनी जाहीर प्रकटनातून केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.