entire cost and coordination of kirtan week was undertaken by 22 army man of Vital village dhule news esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : ‘त्यांनी’ राष्ट्रधर्मबरोबरच सेवाधर्मही जपला!

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : विटाईला येथे तेवीस वर्षांपासून श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह साजरा होत आहे. (entire cost and coordination of kirtan week was undertaken by 22 army man of Vital village dhule news)

सप्ताहाच्या २४ व्या वर्षाचे वैशिष्ट्य म्हणजे या वर्षीच्या कीर्तन सप्ताहाच्या संपूर्ण खर्चाची आणि संयोजनाची जबाबदारी विटाई गावातील २२ फौजींनी मनोभावे स्वीकारलेली होती. राष्ट्रधर्म जपतानाच सेवाधर्म जपणाऱ्या या २२ भारतीय जवानांचे संपूर्ण जिल्हाभरातून कौतुक होत आहे.

सीआरपीएफमध्ये ९, इंडियन आर्मीमध्ये ७, महाराष्ट्र पोलिसमध्ये ५, बीएसएफमध्ये एक अशा वेगवेगळ्या सेवादलात विटाई येथील हे जवान कार्यरत आहेत. हे सैनिक सामाजिक बांधिलकीने एकत्र येऊन गावाच्या वारकरी संप्रदायाचा आदर राखून सेवाधर्म जपत आहेत.

ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे. सहभागी जवान असे : रवींद्र खैरनार, जयकुमार साळवे, सुनील खैरनार, दगाजी खैरनार, केवळ साळवे, किरण भदाणे, ओंकार ठाकरे, समाधान खैरनार, भूषण खैरनार, सचिन साळवे, विशाल खैरनार, संदीप खैरनार, दिलीप खैरनार, बाळासाहेब खैरनार, संजय खैरनार, हिंमत खैरनार, भाऊसाहेब खैरनार, हरीश पाटील, किरण खैरनार, भूषण भामरे, प्रकाश खैरनार, चैतन्य खैरनार.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

सप्ताहाची सांगता काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने झाली. शेवटच्या दिवशी पंकज महाराज (अमळनेर) या २४ वर्षांच्या कीर्तनकार महाराजांना उपस्थित १३ जवानांनी हाती टाळ घेऊन साथसंगत केली. विनायक खैरनार व बाजीराव खैरनार यांच्या मुख्य संयोजनात हा कीर्तन सप्ताह साजरा होत असतो. चालू वर्षी एक अनोखा आणि विलोभनीय सोहळा झाला. खानदेश वारकरी सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी काल्याच्या कीर्तनाला उपस्थित राहून या १३ जवानांचा सत्कार केला.

जवानांच्या या दातृत्वाचे व सेवाधर्माचे कौतुक म्हणून वाहक शरद खैरनार, कवी नरेंद्र खैरनार यांनी गौरविले. नरेंद्र खैरनार यांनी सूत्रसंचालन केले. सोबतच सात दिवस चाललेल्या या कीर्तन सप्ताहावर आधारित दरदिवशी कीर्तन संपल्यानंतर प्रश्नमंजूषा घेण्यात आली. यात यशस्वी झालेल्या मुला-मुलींना विटाईच्या शिवछत्रपती मित्रमंडळामार्फत साखरे महाराजप्रणीत श्री सार्थ ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट देण्यात आले.

या वर्षीच्या सप्ताहाचे आणखी विशेष म्हणजे फौजी ग्रुप विटाईमधील मुख्य संयोजक किरण खैरनार (पोलिस उपनिरीक्षक) व भूषण खैरनार (बीएसएफ)यांनी पूर्ण वेळ उपस्थित राहून संपूर्ण खर्चाचे संयोजन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT