crime esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : वादानंतर निकम ‘कंट्रोल रूम’ला; प्रलंबित कसुरी अहवालाची दखल

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : साक्री शहरात मंगळवारी (ता. १२) रात्रीपासून नाकाबंदीदरम्यान एका व्यापाऱ्याचे वाहन अडविण्याच्या कारणावरून साक्रीचे पोलिस निरीक्षक मोतीराम निकम आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित यांच्यात शाब्दिक चकमक झाली.

त्याचे पर्यवसान निरीक्षक निकम यांनी थेट डॉ. गावित यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.()

शिवाय दोन महिन्यांपासून श्री. निकम यांच्याविरुद्धच्या कसुरी अहवालावरची कारवाई प्रलंबित होती. त्यानुसार पोलिस प्रशासनाने बुधवारी रात्री उशिरा पोलिस निरीक्षक निकम यांची तात्पुरत्या स्वरूपात नियंत्रण कक्षात बदली केली. साक्रीचा पदभार नियंत्रण कक्षातील पोलिस अधिकारी सूर्यवंशी यांच्याकडे तात्पुरता सोपविण्यात आला आहे.

मंगळवारी रात्रीच्या सुमारास साक्री पोलिसांनी नाकाबंदी करत वाहन तपासणी मोहीम सुरू केली. यादरम्यान कासारे येथील आनंद वाणी यांचे वाहन पोलिसांनी थांबविले. त्यांनी वाहन सोडवणुकीसाठी मध्यस्थांमार्फत थेट शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित यांच्याशी संपर्क साधला.

डॉ. गावित व पोलिस निरीक्षक निकम यांचे मोबाईलद्वारे बोलणे सुरू असताना त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. याचे पर्यवसान निरीक्षक निकम यांनी डॉ. गावित यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकाराने संतप्त डॉ. गावित व आमदार मंजुळा गावित समर्थकांनी बुधवारी जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची भेट घेतली.

त्यात निरीक्षक निकम यांच्या बदलीची मागणी झाली. काही राजकीय पदाधिकारी, सामाजिक संघटनांनी निकम यांची बाजू घेत त्यांना साक्री पोलिस ठाण्यात कायम ठेवण्याची निवेदनातून मागणी केली. या घटनेबाबत आमदार मंजुळा गावित यांच्याकडून राज्य शासनाकडेही तक्रार झाली.

दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ पोलिस निरीक्षक निकम यांच्याविरोधात गुरुवारी (ता. १४) साक्री शहर बंद ठेवण्याचे आवाहन डॉ. तुळशीराम गावित समर्थकांकडून सोशल मीडियाद्वारे केले जात होते.

कसुरी अहवाल प्रलंबित

पोलिस निरीक्षक मोतीराम निकम यांच्याविरुद्ध तक्रारींमुळे कसुरी अहवाल तयार झाला. तो तत्कालीन पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी प्रलंबित ठेवला. त्यातच डॉ. गावित समर्थकांचे शिष्टमंडळ भेटीसाठी आल्यानंतर प्रलंबित कसुरी अहवालाच्या पाहणीनंतर निरीक्षक निकम यांना तात्पुरत्या स्वरूपात पोलिस कंट्रोल रूमला ॲटॅच केले असल्याचे प्रशासनाने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वंचित आघाडी'च्या जिल्हाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला; चाकूहल्ला करून मोटारीवर दगडफेक, नेमकं काय घडलं?

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT